शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

आयटीआय’चे दरवाजे ठोठावतात खाजगी कंपन्या

By admin | Updated: July 11, 2014 01:04 IST

‘औरंगाबाद : कमी गुणवत्तेचीच मुले ‘आयटीआय’ करतात, ही भावना आता बदलत्या औद्योगिकरणामध्ये लुप्त होत चालली आहे.

‘औरंगाबाद : कमी गुणवत्तेचीच मुले ‘आयटीआय’ करतात, ही भावना आता बदलत्या औद्योगिकरणामध्ये लुप्त होत चालली आहे. केवळ औरंगाबादच नव्हे तर पुणे औद्योगिक परिसरातील खाजगी कंपन्याही आता येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) जाऊन विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना नोकरीची संधी देत आहेत. ८ जुलैपासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. आज दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांचा आॅनलाईन प्रवेश घेण्यासाठी चांगला प्रतिसाद होता. सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी ‘एआरसी’ (अ‍ॅप्लिकेशन रिसिव्ह सेंटर) उभारण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या एआरसीच्या ठिकाणी आॅनलाईन प्रवेश घेण्याची सुविधा झाली आहे. खाजगी कंपन्यांना ‘आयटीआय’च्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ उपलब्ध होत आहे. त्यामुळे अनेक खाजगी कंपन्या आयटीआयमध्ये जाऊन परिसर मुलाखती घेत आहेत. यामध्ये ‘कॉम्प्युटर आॅपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट’, ‘इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम मेंटेनन्स’, ‘इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स’, ‘इलेक्ट्रीशियन’, ‘मेकॅनिक डिझेल’, ‘मेकॅनिकल आॅटो इलेक्ट्रीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स’ या ट्रेडच्या विद्यार्थ्यांना खाजगी कंपन्याकडून जास्त मागणी आहे. सुरुवातीला परिसर मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांची निवड केल्यानंतर त्यांना कंपनीत ट्रेनी अथवा अ‍ॅप्रेन्टीशिप म्हणून नोकरी मिळते. काही दिवस त्या विद्यार्थ्यांच्या कामाची गुणवत्ता बघितली जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कुशलतेनुसार त्याला चांगल्या पगाराची नोकरी दिली जाते. औरंगाबादेत २०० जागा वाढल्याकंपन्यांचा कल बघून आयटीआयमधील ट्रेडही बदलले आहेत. अलीकडे सिव्हील, आॅटोमोबाईल, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स ग्रुपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गत वर्षाच्या तुलनेत यंदा औरंगाबादेतील मुलांच्या ‘आयटीआय’मध्ये २०० जागा वाढल्या आहेत.विभागातील ८ जिल्ह्यांत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची संख्या ८२ आहे. या ८२ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ८ वी व १० वी उत्तीर्ण १६ हजार १६२ विद्यार्थ्यांना विविध ट्रेडचे प्रशिक्षण दिले जाते.औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ११ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत असून त्यात १२१६ विद्यार्थ्यांना २७ ट्रेडचे प्रशिक्षण दिले जाते.