शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहाचा औरंगाबादेत पेट्रोलपंप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:56 IST

हर्सूल कारागृह प्रशासनाचा शहरात लवकरच स्वतंत्र पेट्रोलपंप सुरू होणार आहे.

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : हर्सूल कारागृह प्रशासनाचा शहरात लवकरच स्वतंत्र पेट्रोलपंप सुरू होणार आहे. कारागृहातील बंदिवान या पंपावर ग्राहकांना पेट्रोल-डिझेलची विक्री करतील. कारागृह प्रशासनातर्फे चालविण्यात येणारा देशातील हा पहिलाच पेट्रोलंपप ठरेल.कारागृहाचे उत्पन्न वाढावे, यासाठी कारागृहाच्या मालकीचा देशातील पहिला पेट्रोलपंप सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पेट्रोलपंपाचा प्रस्ताव पेट्रोलियम कंपनीकडे पाठविण्यात आला आहे.व्ही.आय.पी. रस्त्यावर कारागृहाच्या मोक्याच्या जागेत हा पंप सुरू होणार आहे. या पंपावर खुल्या कारागृहातील उत्तम वागणूक असलेले कैदी इंधन विक्री करतील. प्रस्तावाला कंपनीने ग्रीन सिग्नल दिला की, पंपासाठीच्या आवश्यक सुविधा उभारल्या जातील, असे मोरे यांनी सांगितले.दोषसिद्ध कैद्यांसोबतच दोषसिद्ध होण्यापूर्वी न्यायालयीन कोठडीतील आरोपीही हर्सूल कारागृहात ठेवले जातात. हर्सूल मध्यवर्ती कारागृहाची क्षमता ५९१ कैद्यांची असली तरी प्रत्यक्षात तेथे सध्या १ हजार २१२ कैदी शिक्षा भोगत आहेत. यात ६७ महिला कैद्यांचा समावेश आहे. कारागृह हे सुधारगृह म्हणून ओळखले जावे, यासाठी कारागृह अधीक्षक बी.आर. मोरे हे प्रयत्नशील आहेत.कारागृहातील महिला कैद्यांना राखी तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी दिले आणि त्यांनी तयार केलेल्या राख्यांची विक्री, प्रदर्शन भरविण्यात आले. यासोबतच काही महिला कैद्यांसाठी त्यांनी खाजगी आॅटोमोबाइल कंपनीचे काम मिळविले आहे. या कंपनीचे सुटेभाग तयार करण्याचे काम महिलांना सोपविले. अत्यंत सफाईदार आणि कुशलपणे या महिला काम करीत आहेत. कारागृहातील पुरुष कैद्यांना त्यांच्या आवडीचे काम सोपविले जाते. काही जण फर्निचर तयार करतात, तर काही जण चटई, सतरंजी तयार करतात. हर्सूल कारागृहात उत्तम वागणूक असलेले आणि शिक्षेचा कालावधी संपत आलेल्या कैद्यांना पैठणच्या खुल्या कारागृहात पाठविले जाते. खुल्या कारागृहातील कैद्यांना शेती करण्याची संधी आहे. या शेतीतूनही कारागृहाचे उत्पन्न वाढते.