जालना : येथील राष्ट्रीय हिंदी विद्यालयात जिल्ह्यातील शालेय वाहतूक करणाऱ्या शाळांच्या प्राचार्य तसेच संबंधितांची जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समिती ( आरटीओ) यांच्या वतीने कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकरी रंगानायक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी नायक यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या सुरिक्षत वाहतुकीविषषी महत्वाच्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. शाळा व्यवस्थापानाने शाळेच्या समोरील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता रस्त्याच्या दुतर्फा झे्रब्रा क्रॉसिंग, गतीरोधक उभारणे, शाळा आहे असा फलक लावणे शाळा भरण्याची तसेच सुटण्याची वेळ दर्शविणारा फलक लावण्याच्या सूचना दिल्या. शक्य असल्यास स्कूलबसमध्ये सीसीटीव्ही कॅमेर बसविण्याचे आवाहनही नायक यांनी केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी एलसीडी प्रोजेक्टररच्या माध्यमातून स्कूल बस अधिनियम २०११ बाबत सखोल माहिती दिली. आदर्श स्कूल बस संरचनेबाबत तरतुदी, चालकांची कर्तव्ये, विद्यार्थ्यांची कर्तव्ये, प्राचार्यांची कर्तव्ये याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांची वाहतूक अतिशय महत्व पूर्ण बाब आहे. जी शाळा स्कूल बस संदर्भात हायगय करेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा इशाराही लोही यांनी दिला. यावेळी पोलिस उपाधीक्षक वसावे, उपशिक्षणाधिकारी राजगुरु, सहाय्यक परिवहन अधिकारी सुधीर जायभाये, पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा शेख, मोटर वाहन निरीक्षक किरण लोंढे, संदीप पाटील, प्राचार्य टंडन आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
आरटीओंनी घेतली मुख्याध्यापकांची कार्यशाळा
By admin | Updated: August 25, 2014 01:30 IST