शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

कडब्याचे भाव साडेतीन हजारांपुढे

By admin | Updated: July 28, 2014 00:54 IST

बीड: पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही. जनावरांसाठी गवत आलेले नसल्याने चारा टंचाई निर्माण झाली आहे.

बीड: पावसाळा सुरू होऊन दोन महिन्याचा कालावधी लोटला आहे. अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नाही. जनावरांसाठी गवत आलेले नसल्याने चारा टंचाई निर्माण झाली आहे. ज्वारीच्या कडब्याचे भाव अव्वाच्या सव्वा झाले आहेत. काही पशुमालक गतवर्षीचा कडबा तीन ते साडेतीन हजार रूपये शेकडा भावाने विकत घेत असल्याचे चित्र जिल्हयात पहावयास मिळत आहे. जिल्हयात एकूण ८ लाख २५ हजार ४३४ एवढे पशुधन आहे. यामध्ये मोठी जनावरे ६ लाख ६८ हजार २६८ तर छोटी जनावरे १ लाख ५७ हजार १६६ च्या जवळपास आहेत. मागील तीन वर्षापासून बीड जिल्हयात अत्यल्प पाऊस पडत असल्याने बळीराजा पाणी टंचाई बरोबरच चारा टंचाईच्या संकटात सापडला आहे. अल्प पावसाचा फटका जसा नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याला बसत आहे. तसाच जणावरांच्या चाऱ्या संबंधी देखील बसत आहे. जिल्हयातील अंबाजोगाई, माजलगाव व वडवणी तालुका काही प्रमाणात वगळता आष्टी, शिरूर कासार, पाटोदा व बीड तालुक्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेवराई व धारूर तालुक्याची देखील परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. शेतकऱ्यांना दुध-दुभत्या जनावरांचा आधार असल्याचे सर्वत्र पहावयास मिळते. मात्र मागील दोन महिन्यात झालेल्या असमाधानकारक पावसाने दुग्ध उत्पादनाला फटका बसत असल्याचे शेतकरी श्रीराम वडमारे यांनी सांगितले.पशुधन विक्रीसाठी बाजारातआष्टी व शिरूर कासार तालुक्यात तर मागील तीन वर्षापासून पावसाने पाठ फिरवलेली असल्याने व यंदा देखील पावसाने दडी मारल्यामुळे जनावरांना खाऊ काय घालायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपली दुभती जनावरे बेभाव विकली असल्याचे येथील शेतकरी किसनराव नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)०८लाख २५ हजार ४३४ इतके पशुधन जिल्ह्यात उपलब्ध आहे़ या सर्वांसाठी मुबलक चारा लागतो़०६लाख ६८ हजार २६८ मोठी जनावरे असून छोट्या जनावरांची संख्या १ लाख ५७ हजार १६६ आहे़१५हजार मे. टन इतका चारा प्रत्येक महिन्याला लागतो. पावसाअभावी गवत उगवले नसून चाऱ्याचा प्रश्न आहे़