या वसाहतीत भक्त परिवाराच्या वतीने लोकवर्गणीतून भव्य व आकर्षक मंदिर उभारण्यात आले आहे. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. या प्रसंगी वसाहतीतील नागरिकांनी पूजा, कलश रोहन होम हवन, यज्ञ, भजन, कीर्तन, सुंदरकांड आदी धार्मिक कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता.
कार्यक्रमात निता भराटे, कामिनी मणियार, विद्या सारडा, श्रद्धा शर्मा, वैशाली तोतला आदींना पूजेचा मान देण्यात आला. कार्यक्रमासाठी नरेंद्रसिंग यादव, जितेंद्र बेदमुथा, अरविंद वडाळकर, भूपेंद्र सिंग, जिजा भोसले, भरत डेरे, शैलेश बडजाते, नीलेश भोसले, प्रतीक बडजाते, बिपीन कासलीवाल, मनोज कासलीवाल, संतोष चोरडिया, कुशल पाटणी, नरेंद्र काला, राजेंद्र कासलीवाल, गिरीश गंगवाल, जीवन गंगवाल आदींनी परिश्रम घेतले.
फोटो ओळ- सम्यक गार्डनियात उभारण्यात आलेल्या गणपती मंदिराच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेप्रसंगी कलश घेऊन पूजेसाठी निघालेले भाविक.