शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांचे दबावतंत्र

By admin | Updated: August 14, 2014 02:09 IST

नांदेड :बहुतांश कामे उरकण्याचे प्रयत्न जिल्हा परिषद पदाधिकारी करीत आहेत़ यातून अधिकारी - पदाधिकाऱ्यांत खटकेही उडण्यास प्रारंभ झाला आहे़

नांदेड : आचारसंहिता लागू होण्यास काही दिवसांचा अवधी उरला असताना जिल्हा परिषदेत बहुतांश कामे उरकण्याचे प्रयत्न जिल्हा परिषद पदाधिकारी करीत आहेत़ यातून अधिकारी - पदाधिकाऱ्यांत खटकेही उडण्यास प्रारंभ झाला आहे़ यातून अनेक अधिकाऱ्यांनी कार्यालयात न थांबता दौऱ्यांना पसंती दिली आहे़ जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून करावयाच्या कामांचे नियोजन करण्यात अध्यक्ष बेटमोगरेकर हे गुंतले आहेत़ जवळपास २ कोटी रूपये आणि १३ व्या वित्त आयोगातून ही १ कोटी ८० लाखांचे नियोजन करणे आवश्यक आहे़ हे नियोजन सर्वसाधारण सभेत करणे आवश्यक आहे़ मात्र असे न करता पदाधिकाऱ्यांकडून मनमानी पद्धतीने नियोजन केले जात आहे़ या नियोजनास अधिकाऱ्यांकडून संमती मिळावी अशी अपेक्षा पदाधिकारी बाळगत आहेत़ मात्र अधिकारी नियमावर बोट ठेवून असे करण्यास नकार देत असल्याने पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये खटके उडत आहेत़ बुधवारी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांच्यात बुधवारी विसंवाद घडल्याचाही प्रकार पुढे आला आहे़नियमबाह्यरित्या मंजुरीसाठी पुढे आलेल्या अनेक संचिकांना जिल्हा परिषदेत सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी काळे यांनी ब्रेक लावला आहे़ ही बाब आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसाठी मोठी अडचणीची ठरत आहे़ जवळपास दीड महिन्यांपासून पदाधिकारी - अधिकारी आमने आले आहेत़ यातून पदाधिकाऱ्यांकडून अधिकाऱ्यांना दमदाटीही केल्याची काही प्रकरणे पुढे आली आहेत़दरम्यान, जिल्ह्यात राजीव गांधी पंचायतराज सक्षमीकरण अभियानांतर्गत ग्रामपंचायतींना नूतन इमारत बांधकामासाठी आलेला ३ कोटी १९ लाख ५० हजार रूपयांचा निधी वाटप करताना अनियमतता झाल्याची तक्रार जि़ प़ सदस्य मोहन पाटील टाकळीकर यांनी थेट राज्याचे ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली़ या तक्रारीनंतर गा्रमविकासमंत्र्यांनी निधी वाटपात अन्याय न करता समान न्याय देण्याची सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली आहे़ ६४ ग्रा़ पं़ ना हा निधी वाटप करण्यात त्यात नांदेड व मुखेड तालुक्यात प्रत्येकी ९ ग्रा़ पं़ आहेत़ कंधार व लोहा तालुक्यातही प्रत्येकी ५ ग्रा़पं़ना निधी दिला़ (प्रतिनिधी)