शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

आठवडी बाजार ‘कृउबास’च्या आवारात

By admin | Updated: May 19, 2014 01:04 IST

वाशी : येथील आठवडी बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारपासून भरविण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

 वाशी : येथील आठवडी बाजार हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवारपासून भरविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. याचे उद्घाटन ग्रामपंचायतीचे उपसरपंच नागनाथ नाईकवाडी व विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन छगनराव मोळवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापार्‍यांच्या हस्ते करण्यात आले आहे. येथील आठवडी बाजार पूर्वी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्यावर भरत होता. त्यामुळे शहरातील नागरिकांसह तालुक्यातून येणार्‍या बाजारकरू, वाहनचालकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. आठवडी बाजार चांगला भरावा व्यापार्‍यासह शेतकर्‍यांना चांगली सुविधा मिळावी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत चेडे यांनी पणन मंडळाकडे पाठपुरावा करून बाजार व शेतकर्‍यांसाठी जवळपास २० लाखाचा निधी मंजूर करून घेतला होता. सदरील निधी उपलब्ध झाल्यानंतर या माध्यमातून बाजार कट्टे, अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी हौद, प्रसाधनगृह, मुतारी आदी मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या आहेत. बाजारात सुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी शहरापासून हा बाजार दीड ते दोन किमी दूर असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होणार आहे. शेतकरी आणि वापार्‍यांना मात्र, बाजारासाठी प्रशस्त मैदान उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. दरम्यान, बाजारासाठी येणार्‍यांना निवार्‍याची सोय उपलब्ध नसल्याने उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. आठवडी बाजाराचा लिलाव मागील आठवड्यात ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आला असून तो ६ लाखाच्या आसपास गेला आहे. स्पर्धेत चढ्या दराने बाजार कर गेल्यामुळे याचा फ टका शेतकर्‍यांना व व्यापार्‍यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांसोबतच व्यापार्‍यांतूनही नाराजीचा सूर उमटत आहे. ग्रामपंचायतीने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्तीच्या दराने कर वसुली केली जात असल्याची तक्रार काही बाजारकरूंनी केली. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)