शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
9
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
10
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
11
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
12
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
13
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
14
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
15
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
16
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
17
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
18
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
19
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
20
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?

सात हजारांवर सापांना दिले प्रसादने जीवदान

By admin | Updated: May 30, 2014 00:32 IST

भारत दाढेल , नांदेड मागील सहा- सात वर्षात शहरातील लोकवस्तीत निघालेले सात हजारांवर साप पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडण्याचा छंद प्रसाद शिंदे याने जोपासला आहे़

भारत दाढेल , नांदेड मागील सहा- सात वर्षात शहरातील लोकवस्तीत निघालेले सात हजारांवर साप पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडण्याचा छंद प्रसाद शिंदे याने जोपासला आहे़ विविध पक्षी व सरपटणार्‍या प्राण्यांच्या अभ्यासात मग्न असलेल्या प्रसादने अल्पवयातच सर्पमित्र म्हणून नावलौकीक मिळविला आहे़ साप हा तसा मानवाचा मित्ऱ परंतु सापाचे भय मनात सदैव असतेच़ पावसाळ्याच्या प्रारंभी सापांचा वावर लोकवस्तीत आढळतो़ पावसाने बिळे बुजल्यावर साप आश्रय शोधण्यासाठी इतरत्र हिंडतो़ अशा वेळी कधी घरात तर कधी आंगणात़़़ सापांचे दर्शन होते़ तेव्हा प्रत्येकाचीच बोबडी वळते़ काय करावे, असा प्रश्न पडतो़ आणि कोणी तरी सर्पमित्र बोलवा असे म्हणतो़ साईबाबानगर येथे राहणार्‍या प्रसाद शिंदे याने वयाच्या आठव्यावर्षीच सापांना मित्र समजून त्यांच्याशी जवळीक वाढविली़ सापांविषयी वाटणारे आकर्षण व त्यांची सहानुभूती चौथीत असताना प्रसादला वाटू लागली़ इतरांपेक्षा वेगळे काही तरी करायचे म्हणून सापांच्या विषयीचे पुस्तके त्याने प्रथम वाचून काढले़ सापांची माहिती संग्रहीत करून प्रसादने आपल्या प्रवासाला सुरूवात केली़ अगदी बालवयातच प्रसादने कुठे साप निघाला तर त्याला पकडून सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडायचे काम सुरू केले़ आपले शिक्षण पूर्ण करीत प्रसाद निसर्गाच्या सानिध्यात मुक्तपणे वावरतो़ केवळ सापच नाही तर जखमी प्राणी किंवा पक्षी आढळला तर त्याच्यावर योग्य ते उपचार करून निर्सगाच्या स्वाधीन करतो़ यासंदर्भात प्रसाद म्हणाला, सापाशिवाय इतर सरपटणारे प्राणी तसेच विंचू, स्पायड यांचा शास्त्रीय अभ्यास करणार्‍या सेंटर आॅफ इकॉलॉजीकल सायन्सला नेहमीच मार्गदर्शन व जनुकीय अभ्यासात मदत करतो़ शहरात पोलिस कॉलनी, समता नगर, तरोडा खुर्द या भागात साप निघण्याचे प्रमाण जास्त आहे़ साधारणपणे आजपर्यंत सात हजार साप सापांना पकडून त्यांना मनुष्य वस्तीपासून निसर्गाच्या सान्निध्यात सुखरूप सोडून दिल्याचेही प्रसादने सांगितले़ काही दिवसापूर्वी झालेल्या गारपिटीने अनेक पक्षी जखमी झाले़ त्यांच्यावर उपचार करून त्यांना सोडून दिले़ पालीची नवीन जात माथेरान, चिखलदरा येथील घनदाट जंगलात सापडते़ परंतु नांदेडसारख्या कोरड्या क्षेत्रात नवीन पाल पाहण्यास मिळत आहे़ भारतात दुर्मिळ समजल्या जाणार्‍या रूस्सेल्लस कुकरी आणि भारतीय मृदुकाई साप हे नांदेड मध्येही आढळले़ मागील वर्षी गव्हाणी, पिंगळा व शृंगी जातीचे घुबड तसेच उद मांजर, कोल्हे या प्राण्यांना मुनष्य वस्तीपासून दूर नेऊन सोडले़ या कामात कोणत्याही संस्थेची किंवा कोणतीही आर्थिक मदत न घेता स्वखर्चाने केवळ छंद म्हणून हे काम सुरू असल्याचेही प्रसाद म्हणाला़ साप चावल्यास़़़ साप घरात आल्यास सर्पमित्र येईपर्यंत सुरक्षित अंतरावरून सापावर टॉर्चने व्यवस्थित लक्ष ठेवावे़ नाग, मन्यार, घोणस व फुरसे हे मानवी वस्तीजवळ आढळणारे प्रमुख विषारी साप आहेत़ यांचा दंश प्राणघातक असतो़ सर्पदंश झाल्यावर त्या ठिकाणी कापू नये़ जखम स्वच्छ करावी़ ज्या अवयवास दंश झाला असेल त्या अवयवाच्या ºहदयाकडील बाजूस अवळपट्टी बांधावी़ सर्पदंश झालेल्या व्यक्तींना धीर द्यावा व उबदार ठेवावे़ चालणे, बोलणे असे कोणतेही श्रम करून देवू नये़ डॉक्टरांना सर्पदंश झालेल्या व्यक्तीस कोणत्याही प्रकारची अ‍ॅलर्जी असल्यास सांगावे़ घोणस चावल्यास बॅन्डेज बांधू नये़ सार्पदंश झालेल्या व्यक्तीमध्ये पुढील लक्षणे दिसतात- नाग चावलेल्या जागेवर बधीरपणा येतो़ गुंगी येऊन तोंडातून लाळ गळते़ श्वास घेतेवेळी त्रास होतो़ उलट्या होतात़ मण्यार सापाचे विष नागाच्या विषापेक्षा अति जहाल असते़ बेंबीजवळ असह्य वेदना होतात़ दंशाच्या जागेवर खूप सूज येते़ नाडीचे ठोके अनियमित होतात़ घोणस चावल्यास तीव्र वेदना होतात़ दंशाच्या जागेवर सूज येते़ प्रकाशानुसार डोळ्याच्या बाहुल्या लहानमोठ्या होत नाही़ त्या विस्फारलेल्या राहतात़ सांधे दुखतात़ फुरसे चावलेल्या जागेवर जळजळ होते़ चावलेल्या जागेतून हिरड्यातून, लघवीतून रक्त पडू लागते़ चावलेली जागा हिरवी, निळी पडते़