लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील यशोधन नगर भागातील एका शिक्षिकेच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी साडेपाच तोळे सोन्याच्या दागिण्यांसह १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना गुरूवारी मध्यरात्री घडली.परभणी शहरातील यशोधन नगर भागात शिक्षिका आशा देशमुख यांचे घर आहे. २४ आॅगस्ट रोजी देशमुख या घराला कुलूप लावून नातेवाईकांकडे गेल्या होत्या. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि खोलीतील कपाटात ठेवलेले साडेपाच तोळे सोन्याचे दागिणे व १० हजार रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला. ही बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत नवामोंढा पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, निरीक्षक व्ही.डी.श्रीमनवार दाखल झाले. त्यानंतर श्वानास पाचारण करण्यात आले. श्वान कल्याणमंडपम् परिसरापर्यंत जाऊन घुटमळले. घटनास्थळी ठसे तज्ञानांही पाचारण करण्यात आले होते. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
परभणीत पावणेदोन लाखांची घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:17 IST