कोरोनाचे संकट आणि त्यावर मात करण्यासाठी प्रत्येकाचाच सुरू असलेला लढा ही मध्यवर्ती संकल्पना ठेवून १५ कलावंतांनी हा कार्यक्रम सादर केला. विलास कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केलेला ‘जिंकू कोरोनाचे रण’ हा वीरश्रीपूर्ण पोवाडा अभिजित जोशी, शौनक ठिगळे आणि आकाश मुंडे यांनी सादर केला.
समीर साठे, सारिका कुलकर्णी, अपर्णा देशपांडे, अंकिता मुळे, तृप्ती कुलकर्णी, प्रसून देशपांडे, प्रसाद जोशी आणि वीणा गोसावी यांनी ‘कोरोना शेर है, तो हम सवाशेर है’ ही जयंती ठिगळे लिखित नाटिका सादर केली आणि आजकाल घराघरात जे चित्र दिसते ते प्रेक्षकांसमोर एका पूजा वारे, गौरी कुलकर्णी आणि आकांक्षा गाओरस यांनी कोरोनावर आधारित भारुड सादर केले. संस्थेचे अध्यक्ष शिवकुमार पाडळकर यांनी प्रास्ताविक केले. भरत कुलकर्णी यांनी कलारंगचे पार्थ बावस्कर यांच्यासह अन्य कलावंतांचा परिचय करून दिला.
फोटो ओळ :
लोककला सादर करताना कलारंग संस्थेचे कलावंत.