ईट : भूम तालुक्याचेच नव्हे तर जिल्ह्याचे लक्ष वेधलेल्या ईट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेच्या पॅनलला जबर धक्का देत काँग्रेसचे आण्णासाहेब देशमुख यांच्या ‘सिध्देश्वर ग्रामविकास आघाडी’चे १५ पैैकी १४ उमेदवार विजयी झाले़ सत्ताधाऱ्यांना पराभवाची धूळ चारल्यानंतर विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत मोठा जल्लोष केला़मागील ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसची १५ वर्षाची सत्ता उलथावून शिवसेना- भाजपा व राष्ट्रवादीने ग्रामपंचायत ताब्यात घेतली होती़ शिवसेनेच्या पॅनलला ११ जागा मिळाल्याने त्यांनी सत्ता प्रस्थापित केली होती़ मात्र, यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसने मागील निवडणुकीचा पूरता वचपा काढीत विरोधकांना भूईसपाट केले़ यंदाच्या ईट- झेंडेवाडी, पांढरेवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व जयहनुमान-भाजपा प्रणित पॅनल अशी चौरंगी लढत झाली होती़ यात १५ जागांसाठी ६६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते़प्रचाराच्या रणधुमाळीत सत्ताधारी- विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून रान उठविले होते़ त्यानंतर पाच प्रभागात शांततेत मतदान प्रक्रिया झाली़ चौरंगी लढतीत काँग्रेसचे आण्णासाहेब देशमुख यांच्या ‘सिध्देश्वर ग्रामविकास आघाडी’चे १५ पैैकी १४ उमेदवार विजयी झाले़ यात प्रभाग एक मधून सचिन खामकर, स्वाती डोंबाळे, बालिका हाडुळे, प्रभाग दोन मधून नामदेव माळी, शंभुराजे देशमुख, लताबाई हुंबे, प्रभाग तीन मधून प्रविण देशमुख, विद्या जंगम, विद्या अहिरे, प्रभाग चार मधून रविंद्र खारगे, मंगल भोसले, उध्दव थोरात, प्रभाग पाच मधून नकुला चोरमले, अश्विनी शिंदे हे १४ उमेदवार विजयी झाले़ तर शिवसेनेच्या पॅनलचे केवळ अविशनाश चव्हाण हे एकमेव उमेदवार विजयी झाले़ ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून प्रथमच मागासवर्गीय महिलेला सरपंच होण्याचा मान मिळणार असून, सरपंचपदी विद्या दत्ता अहिरे या विराजमान होणार आहेत़ पॅनलच्या विजयासाठी अण्णासाहेब देशमुख, प्रताप देशमुख, दासराव हुंबे, अनिल देशमुख, आनंद देशमुख, दत्तात्रय आसलकर, विक्रम पिसाळ यांच्यासह समर्थक, कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले़ विजयानंतर पदाधिकारी, समर्थकांसह उमेदवारांनी मोठा जल्लोष केला़उमाचीवाडी ग्रामपंचायतभूम तालुक्यातील उमाचीवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धक्का देत वासुदेव जाधव, प्रकाश शेळके, सुभाष शेळके यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या पॅनलचे सर्वच्या सर्व सात उमेदवार विजयी झाले़ विजयी उमेदवारांमध्ये तात्यासाहेब शेळके, सुजाता शेळके, सुरेश ठोंबरे, शिवाजी गावडे, चित्रावती ठोंबरे, विजूबाई शिंगटे, दैैवशाला चिकणे यांचा समावेश आहे़ज्योतीबाचीवाडीत आघाडीज्योतीबाचीवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सातही जागा जिंकून विद्यमान सरपंच संतोष बरबडे यांना ज्योर्तीलिंग ग्रामविकास आघाडीने पराभवाची धूळ चारली़ विजयी उमेदवारांमध्ये बाळासाहेब जगदाळे, शशिकला जगदाळे, भामाबाई वरबडे, नामदेव चव्हाण, प्रदीप वरबडे, आविदाबाई दोरगे, देवई चव्हाण यांचा समावेश आहे़
ईट ग्रामपंचायतीची काँग्रेसच्या ‘हाता’त सत्ता
By admin | Updated: August 7, 2015 01:13 IST