शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
2
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
3
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली TATAची नवी कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
4
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
5
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
6
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
7
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
8
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
9
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
10
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
13
IND vs PAK: आशिया कप मॅच रेफरीला हटवा! पाकिस्तानची ICCकडे धाव, हस्तांदोलन प्रकरण जिव्हारी
14
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
15
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
16
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
17
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
18
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
19
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
20
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले

मानदेऊळगावात जोडणी नसतानाही आले वीज बिल

By admin | Updated: August 21, 2014 01:19 IST

जालना : महावितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा बिल ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. त्यात आता आणखी एक नवा प्रताप समोर आला आहे.

जालना : महावितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा बिल ग्राहकांच्या माथी मारण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. त्यात आता आणखी एक नवा प्रताप समोर आला आहे. घरात विजेअभावी अंधार असताना व वीज जोडणी घेतलेली नसतानाही महावितरणने विजेचे बिल दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला हे बिल देण्यात आले. त्याव्यक्तीने आठ महिन्यांपूर्वीच वीजमीटर मिळावे म्हणून रितसर अर्ज करून कोटेशन भरलेले आहे. मात्र आठ महिने उलटूनही महावितरणने अद्यापपर्यंत वीजजोडणी तर दिली नाही मात्र बिल माथी मारले आहे.बदनापूर तालुक्यातील मानदेऊळगाव येथील शेषराव संभाजी डोळसे हे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवतात. त्यांनी घरात वीजजोडणी मिळावी म्हणून रितसर अर्ज करून ५५० रूपयांचे कोटेशन भरलेले आहे. १२ डिसेंबर २०१३ रोजी त्यांनी हे कोटेशन भरले. त्याची पावती नं. ००९३३ आहे. त्यावेळी पावतीवर ग्राहक क्रं. ५१०१८०००१९०३ असा पावतीवर लिहून देण्यात आला होता. त्यांना महावितरणचे लाईनमन येवून विज जोडणी करून मीटर बसवून देतील असे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आठ महिने झाले तरी महावितरणने वीजजोडणी दिलेली नाही. मात्र डोळसे यांनी भरलेल्या कोटेशनच्या आधारे त्यांना ३६० रुपयाचे बिल देण्यात आले. त्यावर ग्राहक क्रमांक (कोटेशन प्रमाणे) टाकण्यात आला. तसेच चालू रिंडींग आर. एन. ए. , मागील रिडींग १ व एकून युनिटचा वापर ८० दाखवून त्याचे ३६० रूपये बिल देण्यात आले.बिल भरण्याची शेवटची तारीख २५ आॅगस्ट देण्यात आली. (वार्ताहर)साहेबराव डोळसे यांनी वीज जोडणीसाठी कोटेशन भरूनही त्यांना वीज जोडणी देण्यात आलेली नाही. त्यासाठी आपली मोलमजुरी सोडून त्यांनी अनेक वेळा महावितरणच्या कार्यालयात चकरा मारल्याचे सांगितले. तसेच दोन दिवसांपापूर्वी चक्क हातात बिल आल्याने आपण थक्क झालोत, याबाबतही महावितरणच्या कार्यालयात चकरा मारून पुरवठा नसताना बिल कसे आले असा जाब विचारला असता कोणी उत्तर देण्यास तयार नाहीत. सदर ग्राहकाकडे वीजमीटर नाही, जोडणीही केलेली नाही. त्यांनी ती मिळावी म्हणून रितसर अर्ज करून नियमाप्रमाणे कोटेशन भरलेले आहे. महावितरणने त्यांना जोडणी तर दिलीच नाही उलट विजेचे बिलच दिले. त्यावरून महावितरणमध्ये सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा नमुना समोर आला. महावितरणने बिल रिडिंगसाठी स्वतंत्र एजन्सी नेमलेली असल्याचे सांगितले जाते. महावितरणचे अधीक्षक अभियंता पानढवळे यांना विचारले असता, मला याविषयी काही माहिती नाही. तालुका अभियंत्यांना विचारा असे सांगून जास्त बोलणे टाळले.