लातूर : लातूर पोस्ट कार्यालयाअंतर्गत स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पोस्टमन व एमटीएस या पदासाठी भरतीप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़ लातूर जिल्ह्यात ३९ जागांसाठी पंधरा हजार अर्ज आले आहेत़स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच थेट भरती होत आहे़ यामध्ये आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया १ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली़ दहावी उत्तीर्ण असण्याची अट असून, बऱ्याच दिवसानंतर भरती प्रक्रिया होत असल्याने जिल्ह्यातील पोस्ट कार्यालयांत गर्दी झाली आहे़ दहावीची अर्हता पात्रता असली तरी पदवी, पदव्युत्तर पदवी धारण केलेल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत़ आॅनलाईन अर्ज करण्यासाठी १८ फेब्रुवारी २०१५ ही शेवटची तारीख असल्याने बुधवारी आॅनलाईन फॉर्म भरून चलन दाखल करण्यासाठी पोस्ट कार्यालयात मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच गर्दी होती. सायंकाळपर्यंत पंधरा हजार अर्ज दाखल झाले आहेत़ प्रशासनाने स्वीकृतीची खास सोय केली होती़पोस्टाची भरतीसाठी लातूर जिल्ह्यासाठी ३९ जागा आहेतग़ांधी चौकातील पोस्टाच्या मध्यवर्ती कार्यालयात चलन भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी झाली होती़ त्यामुळे पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता़ पोस्टात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भरती होत असल्याने उमेदवारांची गर्दी झाली होती़ दरम्यान, पाच काऊंटर चलन भरण्यासाठी उघडले आहेत़
टपाल खात्यात जागा ३९़़ अर्ज १५ हजारांवऱ़़!
By admin | Updated: February 19, 2015 00:45 IST