लातूर : लातूर पोस्ट कार्यालयातून शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच बँकेतील कर्मचारी व शाळेतील कर्मचाऱ्यांनाही गुंतवणूक करण्यास मुभा दिली दिली आहे. त्यामुळे महिन्याकाठी पोस्टाच्या पोस्टल लाईफ इन्शुरन्सच्या माध्यमातून १ कोटींचे उत्पन्न मिळाले.पोस्टल लाईफ इन्शुरन्सच्या माध्यमातून सध्यापर्यंत फक्त शासकीय कर्मचाऱ्यांनाच पोस्टल पॉलिसीचा लाभ घेता येत होता़ परंतु, आता यामध्ये कर्मचारी वाढत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. ३५ ते ६० वर्षापर्यंत पोस्टल लाईफ इन्शुरन्सद्वारे गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करुन दिल्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे़ त्यामुळे महिन्याकाठी पोस्टाला आता १ कोटींवर उत्पन्न मिळत असल्याचे डाक विभागातून सांगण्यात आले.
विम्यातून पोस्टाला मिळाले १ कोटी ५ लाखांचे उत्पन्न
By admin | Updated: January 5, 2015 00:37 IST