शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक मंचचा पोस्टाला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:41 IST

त्रुटीची सेवा दिल्याच्या कारणावरुन अर्जदाराने भरलेले २ लाख रुपये पोस्ट खात्याने परत करावेत, असा आदेश ग्राहक न्यायमंचने दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : त्रुटीची सेवा दिल्याच्या कारणावरुन अर्जदाराने भरलेले २ लाख रुपये पोस्ट खात्याने परत करावेत, असा आदेश ग्राहक न्यायमंचने दिला आहे.पूर्णा तालुक्यातील कावलगाव येथील सुनीता धवन यांच्या पतीने पोस्ट खात्यात विमा पॉलिसी घेतली होती. त्यानंतर मोटार अपघातात त्यांचे पती कोमामध्ये गेले. त्यामुळे ते पॉलिसीचे पुढील हप्ते भरु शकले नाहीत. शेवटी त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पतीने काढलेल्या विमा पॉलिसीच्या रक्कमेसाठी सुनीता धवन यांनी पोस्ट खात्याकडे अर्ज केला.मात्र हप्ते न भरल्याने पॉलिसी लॅप्स झाल्याचे कारण देत हा अर्ज पोस्ट कार्यालयाने फेटाळून लावला. या प्रकरणी सुनीता धवन यांनी अ‍ॅड. गजानन चव्हाण यांच्या मार्फत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात पोस्ट खात्याविरुद्ध तक्रार दाखल केली.अर्जदाराचे पती हे कोमामध्ये गेल्याने पॉलिसीचे पुढील हप्ते भरु शकले नाहीत, ही बाब पोस्ट खात्याने ग्राह्य धरुन पुढील हप्ते भरावेत, अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही. फार तर पोस्ट खात्याने उर्वरित हप्त्याची रक्कम कपात करुन बाकीची रक्कम अर्जदारास परत देणे आवश्यक होते. मात्र असा कोणताही विचार न करता खात्याने विमा दावा निरस्त केला. ही बाब सेवेतील त्रुटी आहे, असा निष्कर्ष काढला. त्यानंतर पोस्ट खात्याने अर्जदार सुनीता धवन यांना न भरलेले हप्ते कपात करुन २ लाख रुपये द्यावेत.तसेच मानसिक त्रासापोटी २ हजार ५०० रुपये दंड द्यावा, असा आदेश ग्राहक न्यायमंचाने दिला आहे. या प्रकरणात अर्जदाराच्या वतीने अ‍ॅड. गजानन चव्हाण यांनी बाजू मांडली.