शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

कारखान्यांसमोर ऊसटंचाईचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2016 00:55 IST

कळंब अलिकडे राज्याच्या साखर कारखानदारीमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखानदारीपुढेही यावर्षीही ऊसटंचाईचे संकट घोंघावत आहे.

बालाजी आडसूळ कळंबअलिकडे राज्याच्या साखर कारखानदारीमध्ये महत्त्वाचे स्थान मिळवलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखानदारीपुढेही यावर्षीही ऊसटंचाईचे संकट घोंघावत आहे. यामुळे जिल्ह्यातील १४ प्रमुख साखर कारखान्यांपैकी केवळ दोनच कारखान्यांचे ‘बॉयलर’ सद्यस्थितीत अग्नीप्रदीपन झाले असून, इतर व्यवस्थापनाचा यंदा कल 'क्रशींग' बंद ठेवण्याकडेच दिसून येत आहे. उपलब्ध ऊसाचाही बेण्यासाठीच अधिक वापर होत असल्याने गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांनाही गेटकेन ऊसावर अवलंबून रहावे लागणार आहे. एकूणच या स्थितीचा जिल्ह्याच्या अर्थकारणाला मोठा फटका बसणार आहे. तीन दशकांपूर्वी तेरणासारख्या कारखान्याचा अपवाद वगळता साखर उद्योगाच्या गणतीमध्ये जिल्ह्याचा नामोल्लेख होत नव्हता. सिंचनाची मर्यादित साधने, प्रचलित पीक पद्धती, मोजकेच एक-दोन कारखाने यामुळे उसाचे क्षेत्र जेमतेमच असायचे. यातही तेरणापट्टा वगळता इतर भागात ऊसाची गोडी गुळापुरतीच मर्यादीत रहायची. परंतु, नव्वदच्या दशकात जिल्ह्यातील पारंपरिक सिंचन पद्धतीत बदल झाले. अनेक नवी जलसाठवण स्त्रोत अस्तित्वात आली. वैयक्तिक विहिर व बोअरवेल्सची संख्या वाढत गेली. जशी साधनं वाढली तशी लगतच्या पश्चिम महाराष्ट्रातील ऊसशेतीची बागायती हवा डोक्यात शिरकाव करू लागली. यातूनच जिल्हयात ऊस शेतीमध्ये झपाट्याने वाढ झाली. यामुळे तेरणा, तुळजाभवानी नंतर क्रमाक्रमाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऊसशेतीला समांतर साखर कारखानदारी बहरू लागली. यामुळेच गत दहा वर्षात राज्यतील साखर कारखानदारीच्या आलेखात जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण योगदान नोंदले जावू लागले. या साखर कारखानदारीचा ग्रामीण भागातील लोकजीवनावर सुपरिणाम तर झालाच शिवाय अर्थकारणासही मोठा हातभार लागला आहे.असे असताना जिल्ह्यात २०१० नंतर पावसाचे प्रमाण घटत चालले आहे. अत्यल्प पावसाने नदी, नाले अपवादानेच वाहिले. या स्थितीचा पाणीसाठ्यावर प्रतिकूल परिणाम होवून जिल्ह्यात बहरलेल्या ऊसशेतीला नकळत उतरती कळा लागत गेली. जवळपास साठ हजार हेक्टरच्या पुढे सरकलेल्या ऊस क्षेत्रात २०१३ पासून दरवर्षी घट होत चालली. यातच २०१४-१५ मध्ये यात लक्षणीय घट झाली. साल २०१५-१६ मध्ये तर गावोगावी पिण्याचे पाणी उपलब्ध होणे कठीण झाले होते. यामुळे प्रत्येक गावात केवळ बोटावर मोजण्याइतपत शेतकऱ्यांकडे तोही अल्प स्वरूपात ऊस शिल्लक राहिला आहे. बागायतदारांवरही तुळशीच्या लग्नाला ऊस शोधण्याची वेळ आली होती. एकीकडे कारखानदारी विकसित होत असताना जिल्ह्यात अत्यल्प पावसाने ऊसशेती संकटात सापडत चालली होती. २०११ ते २०१५ या पाच वर्षातील असमाधानकारक पर्जन्याचा परिणाम यंदा दिसून आला असून, सुस्थितीत असलेल्या सर्वच कारखान्यांपुढे ऊसटंचाईचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. दुष्काळी स्थितीमुळे नॅचरलच्या कार्यक्षेत्रातही जवळपास दहा हजार हेक्टर ऊसाची तूट आहे. अशीच समस्या इतर कारखान्यांसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात कारखान्यांची संख्या मोठी असली तरी नॅचरल, शंभू महादेव, भैरवनाथ, लोकमंगल, कंचेश्वर, भीमाशंकर हे खाजगी, तर डॉ. आंबेडकर, विठ्ठलसाई, शिवशक्ती इ. दहा कारखाने गाळपाच्या शर्यतीत मोठ्या ताकदीने उतरू शकत होते. परंतु ऊसटंचाईचा प्रश्न असल्याने व गेटकेन ऊसाचीही शाश्वती नसल्याने यातील केवळ पाच कारखान्यांनीच साखर आयुक्त कार्यालयाकडे गाळप हंगाम २०१६-१७ साठी तयारी असल्याचे कळविल्याचे नांदेड येथील सहसंचालक कार्यालयातील सूत्रांनी सांगितले. यात शंभू महादेव (कळंब), विठ्ठलसाई (मुरूम), कंचेश्वर (तुळजापूर) व लोकमंगल (लोहारा) यानी स्वारस्य दाखवले असले तरी प्रत्यक्षात ‘बॉयलर’ पेटवून ‘क्रशींग’ची तयारी केवळ विठ्ठलसाई व शंभू महादेवनेच सुरू केली आहे. यंत्रणांची जुळवाजुळव, उसाचे नियोजन यात या दोन्ही कारखान्याचे व्यवस्थापन सध्या व्यस्त आहे.