शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीवर मात करून एक एकरात जोपासली डाळिंबाची बाग

By admin | Updated: September 4, 2014 01:22 IST

गजानन सपकाळ , वरूड बु. येथील प्रगतशील शेतकरी सुदाम शेनफड काळे यांनी आपल्या एक एकर शेतीवर जवळपास ३०० डाळिंबाची झाडे लावून जोपासली आहे. व सध्या डाळींब काढणीस आली आहे.

गजानन सपकाळ , वरूड बु. येथील प्रगतशील शेतकरी सुदाम शेनफड काळे यांनी आपल्या एक एकर शेतीवर जवळपास ३०० डाळिंबाची झाडे लावून जोपासली आहे. व सध्या डाळींब काढणीस आली आहे. गतवर्षी दुष्काळ असतांना परिस्थितीवर मात करीत काळे यांनी मिळेल तेथून टँकरद्वारे पाणी आणून ठिबकची जोडणी करून बागेची जोपासना केली परंतु त्यानंतर गारपीटीने हाती आलेले उत्पन्न जाते की काय अशी भिती होती. या संकटाला खचून न जाता त्यावर मात करत चार वर्षांपासून अगदी पोटच्या मुलाप्रमाणे डाळींब झाडांचा सांभाळ केला. चार वर्षांमध्ये दोन वेळेला गारपिटीने नुकसान झाले. तरीही त्यांची तमा न बाळगता अहोरात्र कष्ट करीत जोपासना करीत कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक ज्ञानदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत कुशलतेने डाळींब काढण्यात आली.चार वर्षांमध्ये जवळपास तीन लाख रूपये खर्च झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पाण्याच्या कमतरतेमुळे शेततळ्याची गरज असून त्यासाठी प्रस्ताव पाठविला,परंतू त्यावर आजपर्यंत कुठलीही कार्यवाही न झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कृषी विभागाने मदत केल्यास काळेंचे अनुकरण दुसरे शेतकरी व जास्तीत जास्त फळबागा निर्माण होईल अशी आशा आहे. एका एकरमध्ये पाण्याची कमतरता असूनही डाळींबाची बाग फुलविण्यात आली असल्याने केवळ योग्य नियोजनामुळे आणि ठिबक सिंचन पध्दतीमुळे हे शक्य झाले असल्याचे शेतकरी शेनफड यांनी सांगितले. इतर शेतकऱ्यांनाही या पध्दतीचा अवलंब करावा असे ते म्हणाले.