शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्रावरून ‘श्रेयवादा’चे राजकारण...!

By admin | Updated: December 29, 2016 22:53 IST

बीड रबी हंगाम सुरू झाल्यापासून विभागात रोहित्रांची टंचाई भेडसावत आहे.

राजेश खराडे बीडरबी हंगाम सुरू झाल्यापासून विभागात रोहित्रांची टंचाई भेडसावत आहे. आठ दिवसांपूर्वी विभागाकरिता १०० रोहित्रांचा पुरवठा झाल्याने प्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या रोहित्रांचा जिव्हाळ्याच्या प्रश्नात लोकप्रतिनिधींनी उडी घेतली असून, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने श्रेयवादाचे राजकारण रंगले आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या ३-४ वर्षांपासून कृषी पंप बंद होते; मात्र यंदा अतिवृष्टीमुळे मुबलक प्रमाणात पाणी साठा झाला आहे. त्यामुळे कृषी पंपांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असल्याने रोहित्र बिघाडाचे प्रमाण वाढले आहे. दुरुस्तीसाठी दाखल केलेले रोहित्र मिळविण्याकरिता शेतकऱ्यांनी महावितरणच्या दारी खेटे मारले आहेत. येथील विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनीही रोहित्राच्या पूर्ततेसाठी इतर विभागांशी संपर्क साधून रोहित्रे मिळविली होती. त्यातच डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला ऊर्जामंत्र्यांकडून बीड विभागाकरिता ४०० रोहित्र पूर्ततेचे आश्वासन देण्यात आले होते. त्यापैकी जिल्ह्याकरिता १०० रोहित्रांचा पुरवठा झाला असल्याने परिस्थिती आटोक्यात आली आहे.अधिकाऱ्यांचे परिश्रम व शेतकऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे मिळालेल्या रोहित्रांचे श्रेय आता लोकप्रतिनिधी लाटू पाहत आहेत. केवळ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यांसमोर हे राजकारण केले जात असल्याचे दिसत आहे. रोहित्राचा प्रश्न बाजूला ठेवून केवळ माझ्यामुळे हे शक्य झाले, असा दावा हे लोकप्रतिनिधी करताना दिसत आहेत.रोहित्रे मिळविण्याकरिता वेळप्रसंगी अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींच्या अरेरावीची भाषेला सामोरे जावे लागले. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.