शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धिबळाचा खेळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 00:38 IST

महापौरपदासाठी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. अडीच वर्षे महापौरपद मिळणार असल्याने भाजप युतीमधील करार मोडून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करीत आहे.

मुजीब देवणीकर ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापौरपदासाठी पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक घेण्यात येणार आहे. अडीच वर्षे महापौरपद मिळणार असल्याने भाजप युतीमधील करार मोडून स्वबळावर निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करीत आहे. बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपमधील इच्छुकांनी ‘बुद्धी’बळाचा खेळ सुरू केला आहे. कोणत्याही परिस्थितीत महापौरपद भाजपकडे जाणार नाही यासाठी शिवसेनेनेही कंबर कसली असून, पूर्वीपासूनच सत्तेची गुरूकिल्ली समजल्या जाणाºया अपक्षांची भूमिका ऐनवेळी निर्णायक ठरणार आहे.महापौर बापू घडमोडे यांचा कार्यकाळ ३१ आॅक्टोबर रोजी संपत आहे. त्यानंतर महापौर निवडणूक घेण्यात येईल. शिवसेनेकडे चिन्हावर निवडून आलेल्या २८ नगरसेवकांसह दहापेक्षा अधिक अपक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. भाजपकडे स्वत:चे २३ आणि अपक्ष आघाडीतील १२ असे मिळून ३५ नगरसेवक आहेत. एमआयएमकडे २४ नगरसेवक आहेत. ते विरोधीपक्ष म्हणून स्वत:चा उमेदवार उभा करणार, हे निश्चित. आकड्यांचे गणित कोणत्याच पक्षासोबत नाही. अडीच वर्षांपूर्वी शिवसेना-भाजप युतीने एकत्र येऊन अपक्षांच्या कुबड्या घेत सत्तेवर अधिराज्य गाजविले.आता अडीच वर्षे महापौरपद असल्याने भाजपकडून करार मोडण्याची भाषा करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शहर विकास आराखड्याचे प्रकरण महापौर म्हणून चालविता यावे यासाठी भाजपकडून युती तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एक महापौरपद घेतले तर अडीच वर्षे स्थायी समिती सभापती, प्रभाग समित्या, स्थायी समिती सदस्य आदी महत्त्वाच्या पदांवर पाणी फेरावे लागेल.