शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनंतर फुटणार राजकीय फटाके

By admin | Updated: November 14, 2015 00:49 IST

कळंब : शहरात अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, पालिकेच्या पाणीपुरवठा समितीतील चार सदस्यांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली आहे़

कळंब : शहरात अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, पालिकेच्या पाणीपुरवठा समितीतील चार सदस्यांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली आहे़ परिणामी दिवाळीनंतर पाणीप्रश्नावरून पालिकेत राजकीय फटाके जोरात फुटण्याची शक्यता आहे़शहराच्या काही भागात सध्या सात ते आठ दिवसाआड तर काही भागात चार ते पाच दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जातो़ पालिका प्रशासनाच्या कारभारावर विसंभून न राहता काही सदस्यांनी आपापल्या प्रभागात स्वखर्चाने पाणी उपलब्ध करून दिले आहे़ एकंदरीत शहरात पाणी समस्येवरून नागरिकांमध्येही असंतोष दिसत आहे़ मांजरा धरणातून शहराला पाण्याचा पुरवठा होता़ हा पाणीपुरवठा दीर्घकाळ टिकणार नाही, या कारणाने नगर पालिकेने पाणी कपात करून बचतीचा मार्ग अवलंबिला आहे़ परंतू धरणात पाणीसाठा आहे, तोपर्यंत पुरेसा व नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे़ शहरवासियांच्या या मागणीला पालिका प्रशासन मात्र दाद देताना दिसत नाही़ मांजरा धरणातून इतर शहर तसेच गावांना पाण्याचा पुरवठा होतो़ त्या ठिकाणी पाणी बचत करण्यासाठी पाणी कपात होते का ? हे पाहून नगर पालिकेने धोरण ठरवावे, अशी मागणीही होत आहे़शहरातील पाणी समस्या पाहता पाणी पुरवठा समितीवरील सदस्य पांडुरंग कुंभार, संजय मुंदडा, कांतीलाल बागरेचा व छायाताई आष्टेकर या नगरसेवकांनी समितीच्या बैठकीत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे लेखी आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले होते़ या आदेशाला केराची टोपली दाखवून सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण कायम ठेवण्यात आले आहे़ पालिकेतील काही मंडळींच्या दबावामुळे पाणीपुरवठा विभागाने समितीचे आदेश धुडकावल्याची चर्चाही सुरू आहे़ पाणी पुरवठ्याचे श्रेय विरोधकांना जाऊ नये, यासाठी समितीच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे़ या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा समितीचे चार सदस्य १६ नोव्हेंबर रोजी राजीनामे देणार असल्याचे वृत्त आहे़ (वार्ताहर)