शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस भरती होणार; पण संख्या किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:06 IST

बापू सोळुंके औरंगाबाद : एकीकडे राज्य सरकार पोलीस भरतीची जय्यत तयारी करीत असताना औरंगाबाद शहर पोलिसांतर्फे किती पदांची भरती ...

बापू सोळुंके

औरंगाबाद : एकीकडे राज्य सरकार पोलीस भरतीची जय्यत तयारी करीत असताना औरंगाबाद शहर पोलिसांतर्फे किती पदांची भरती होणार याविषयी माहितीच उपलब्ध नसल्याचे समोर आले. दुसरीकडे औरंगाबाद ग्रामीण आणि भारत बटालियनतर्फे रिक्त पदांची माहिती शासनाला पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस भरती रद्द झाली, तर २०१९ साली लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहितामुळे पोलीस भरती झाली नव्हती. रखडलेली पोलीस भरती तातडीने घ्यावी, अशी मागणी राज्यातील बेरोजगार तरुण करीत आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन टप्प्यात १२ हजार ५०० पोलिसांची पदे भरणार असल्याचे जाहीर केले. गृहमंत्री यांच्या घोषणेने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये उत्साह संचारला आहे. पोलीस भरतीकरिता औरंगाबाद शहर पोलिसांच्या अस्थापनेतर्फे किती पदे भरण्यात येणार आहे, याविषयी पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांना विचारले असता तांत्रिक कारणांमुळे सध्या ही माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी नमूद केले. अनुकंपा आणि जिल्हा बदलीसाठी काही पोलिसांनी अर्ज केलेले आहेत. ते अर्ज मंजूर झाले तर पदांची संख्या कमी जास्त होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून ८९ पदे भरली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले. याबाबतची माहिती शासनाला पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सातारा येथील भारत बटालियनच्या अस्थापनेवर ३० पदे रिक्त असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. रिक्त पदांची माहिती शासनाला सादर करण्यात आली.

चौकट

भरती करण्याचे अधिकार

४० पेक्षा अधिक पदे रिक्त असेल तर स्वतः भरती करण्याचे अधिकार आस्थापनेला असतात. त्यापेक्षा कमी पदे भारत बटालियनची रिक्त आहेत. यामुळे शासनाच्या आदेशाने या रिक्त पदाची भरती प्रक्रिया औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाला अथवा शहर पोलीस आयुक्तालयास घेण्यास सांगितले जाऊ शकते.