शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

एका कॉलमुळे आरोपी गायकवाडला शोधले पोलिसांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:02 IST

औरंगाबाद: मुकुंदवाडी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला आरोपी अमर गायकवाड उर्फ अमऱ्याने एक कॉल त्याच्या आईच्या ...

औरंगाबाद: मुकुंदवाडी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला आरोपी अमर गायकवाड उर्फ अमऱ्याने एक कॉल त्याच्या आईच्या मोबाईलवर केला आणि तो मनमाड रेल्वेस्थानक परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. यानंतर रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलिसांची मदत घेऊन अवघ्या काही मिनिटात त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी अमर गायकवाडला आणण्यासाठी मुकुंदवाडी पोलिसांचे पथक मनमाडला रवाना झाले.

वृध्दाला मारहाण करून त्यांच्या खिशातील पैसे हिसकावून नेल्याच्या आरोपाखाली मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपी अमर भाऊसाहेब गायकवाडला ९ फेब्रुवारी रोजी रात्री अटक केली होती. पोलीस हवालदार दादा काटकर आणि कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी मुकुंदवाडी ठाण्यात नोंद केली व पोलीस व्हॅनमध्ये बसविले. हातकडी टोचत असल्याची तक्रार त्याने केल्याने पोलीस कर्मचारी त्याच्या एका हातातील हातकडी काढून दुसऱ्या हातात घालत होते. याचवेळी पोलीस हवालदार काटकर यांच्या हाताला झटका देऊन अमर गाडीतून उडी मारून पळून गेला. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र रात्रभर शोध घेऊनही तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. त्याच्याजवळ मोबाईल नव्हता. पोलिसांनी त्याच्या आईच्या मोबाईलवर येणाऱ्या कॉलवर नजर ठेवली होती.