शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी हाती घेतली स्वच्छता मोहीम

By admin | Updated: August 27, 2014 01:38 IST

दिंद्रुड: येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने एक सामाजिक बांधीलकी म्हणून मागील तीन दिवसांपासून स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे.

दिंद्रुड: येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने एक सामाजिक बांधीलकी म्हणून मागील तीन दिवसांपासून स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. पावसाळ्यात शहरात झालेली घाण आणि त्यापासून नागरीकांचे धोक्यात आलेले आरोग्य याची दखल घेत ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. ही मोहिम राबविणारे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.ग्रामीण भागात पोलीसांकडे पाहण्याचा दृष्टीकोन खुप वेगळा असतो. मात्र त्यांचा विश्वास जिंकत शहरातील व पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाजवळील स्वच्छता करण्यास दिंद्रूड पोलीस ठाण्याच्या वतीने मोहीम हाती घेतली. या मोहिमेला ग्रामस्थांमधून उर्त्स्फूत प्रतिसाद मिळत आहे. दिंद्रूड पोलीस ठाण्याच्या परिसरात व सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस परिश्रम घेणारे कर्मचारी यांच्या निवासस्थानाशेजारीच मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले होते. कॉलनीत सर्वत्र काटेरी बाभळ, गवत व घाण पाणी साचले होते. त्यामुळे येथील पोलीस कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात आले होते. येथे राहण्यास कर्मचाऱ्यांमधून टाळाटाळ होत होती. कर्मचाऱ्यांचे होत असलेले हाल लक्षात घेता येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांनी शनिवारपासून स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत ठाण्याचे सर्वच अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले आहेत.ग्रामस्थांच्या वतीने पोलीस कॉलनीच्या परिसरातील झाडेझुडपे तोडून पथदिवे बसविले जात आहेत. जुन्या इमारतीच्या ठिकाणी अनेक मोठमोठी झाडे धोकादायक बनली होती, ती झाडेही ग्रामस्थांच्या मदतीने तोडण्यात आली. ही झाडे तोडण्याअगोदरच चौधरी यांनी इतर दोन झाडांची लागवड केली होती हे मात्र विशेष. ग्रामस्थ व पोलीस यांच्या समन्वयातून ही स्वच्छता मोहीम राबविली जात असल्याने इतरांसमोर एक आदर्श निर्माण झाला आहे. चौधरी यांचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. (वार्ताहर)