शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

ताईच्या जेलभरोने पोलीस दमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:51 IST

अंगणवाडी कर्मचा-यांना कामावरून कमी करण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार वाढल्यामुळे आयटकप्रणीत अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने गुरुवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेण्यात आला व तेथे जेलभरो सत्याग्रह सुरू केला

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अंगणवाडी कर्मचा-यांना कामावरून कमी करण्याच्या धमक्या देण्याचे प्रकार वाढल्यामुळे आयटकप्रणीत अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने गुरुवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा नेण्यात आला व तेथे जेलभरो सत्याग्रह सुरू केला. तथापि, आंदोलक महिला कर्मचा-यांना अटक करून पोलीस व्हॅनच्या साहाय्याने आयुक्तालयात नेऊन सोडण्यात आले. यासाठी व्हॅनला तब्बल २२ ते २३ फे-या माराव्या लागल्यामुळे पोलिसांची मात्र दमछाक झाली.अंगणवाडी कर्मचा-यांच्या संपाचा आज २५ वा दिवस आहे. शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात वाढ जाहीर केली; पण ती संघटनांच्या कृती समितीला अमान्य आहे. त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी संपावर ठाम आहेत.परिणामी, जिल्हा परिषदेने अंगणवाड्यांच्या माध्यमातून गरोदर माता, स्तनदा माता, ० ते ६ वयोगटातील बालकांना पोषण आहार वितरणाची प्रक्रिया मुख्य सेविका, स्थानिक बचत गट व आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून पार पाडली जात आहे, असे असले तरी अनेक अंगणवाड्यांना आंदोलक सेविका व मदतनिसांनी कुलूप लावलेले असल्यामुळे त्यांच्यावर किल्ल्या देण्यासाठी दबाव येत असल्याचा आरोप आज सेविका व मदतनिसांनी केला. दुपारी १.३० वाजेच्या सुमारास पैठणगेट येथून अंगणवाडी कर्मचा-यांच्या मोर्चाला प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेवर हा मोर्चा धडकण्यापूर्वीच तेथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे दोन्ही मुख्य दरवाजे बंद करण्यात आले. मात्र, मोर्चेकरी महिला ‘जेलभरो’वर आग्रही होत्या. त्यामुळे पोलिसांनी एका मुख्य प्रवेशद्वारातून २५-३० आंदोलक महिलांना जिल्हा परिषदेत प्रवेश दिल्यानंतर पुन्हा दरवाजा बंद केला जात होता. त्या महिलांनी घोषणाबाजी करत जिल्हा परिषद दणाणून सोडली. काही वेळानंतर मग त्या महिलांना व्हॅनमध्ये बसवून पोलीस त्यांना आयुक्तालयाच्या मैदानावर सोडून परत यायचे. आंदोलक महिलांना अटक करून पोलीस आयुक्तालयाच्या मैदानात सोडण्यासाठी व्हॅनला जवळपास २२ ते २३ फेºया माराव्या लागल्या. प्रा.राम बाहेती, अनिल जावळे, अभय टाकसाळ, बुद्धप्रिय कबीर, विलास शेंगुळे, तारा बनसोडे, शालिनी पगारे, माया भिवसाने, शीला साठे, मीरा अडसरे, संगीता वैद्य, ललिता दीक्षित, सुनीता शेजवळ आदी मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड तसेच महिला व बालकल्याण विकास विभागाचे अधिकारी संजय कदम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.