बदनापूर : शहरातील गल्लीबोळात जाऊन भाऊ-दादांसह अन्य फॅन्सी नंबरच्या ६४ मोटारसायकली गुरूवारी थेट पोलीस ठाण्यात उचलून आणल्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेबदनापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक तथा परीक्षाविधीन सहा पोलीस अधिक्षक डॉ प्रियंका नरनावरे यांनी दि १६ एप्रिल रोजी शहरातील मेन रोडसह गल्लीबोळात जाऊन दादा, भाऊ अशा विविध फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या व विना क्रमांकाच्या नो पार्कींगमधील उभ्या अशा तब्बल ६४ मोटारसायकली उचलून थेट पोलीस ठाण्यात आणुन जमा केल्या. या कारवाईमुळे यातील अनेक मोटारसायकल धारकांनी पोलीस ठाण्यात एकच गर्दी केली. त्यांना या फॅन्सी नंबर प्लेट ताबडतोब बदलून त्या जागी कायदेशीर असलेल्या नंबर प्लेट बसवून आपापल्या गाडया नेण्याची सूचना डॉ नरनावरे यांनी केली. त्यामुळे अनेक मोटारसायकलधारक कायदेशीर नंबर प्लेट बनवुन घेण्यासाठी धावपळ करीत असताना दिसले. तसेच काही मोटारसायकल धारकांकडुन रितसर दंडही वसुल करण्यात आला. (वार्ताहर)
‘भाऊ-दादां’ना दाखविले पोलीस ठाणे
By admin | Updated: April 17, 2015 00:38 IST