शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: पंजाबमधील अमृतसरमध्ये ब्लॅकआउट, लोकांना घरातच राहण्याचे आवाहन
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

‘सीसीटीएनएस’मुळे पोलिस गतिमान

By admin | Updated: December 20, 2015 23:35 IST

बालासाहेब काळे, हिंगोली क्राईम क्रिमिनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) ही प्रणाली हिंगोली जिल्ह्यातील १२ ठाण्यांसह १८ युनिटमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे.

बालासाहेब काळे, हिंगोली पोलिसांच्या कामकाजात गतिमानता आणण्यासाठी सर्व पोलिस ठाणी आॅनलाईन करण्यासाठी क्राईम क्रिमिनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टीम (सीसीटीएनएस) ही प्रणाली हिंगोली जिल्ह्यातील १२ ठाण्यांसह १८ युनिटमध्ये कार्यान्वित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ९४८ पोलिसांना सीसीटीएनएसचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून त्यासाठी लागणारी संपूर्ण यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असून त्याला तोंड देण्यासाठी पोलिस दलाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांचे कामकाज आॅनलाईन करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला. हिंगोली पोलीस दलात सीसीटीएनएस ही संगणक प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी मागील वर्षभरापासून डाटा एन्ट्रीचे काम सुरू होते. या सिस्टीमसाठी लागणारी उपकरणे १२ ठाण्यांसह पोलिस मुख्यालयातील सर्व्हर रूममध्ये बसविण्यात आलेली आहेत. प्रत्येक ठाण्याची संगणकीय माहिती गोळा करण्यासाठी पोलिसांना बेसिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रणालीचा वापर करण्यासाठी पोलिस अधीक्षक कैलास कणसे यांनी साधारणत: ९०० अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवड केली आहे. यातील ६०० जणांनी प्रशिक्षण पूर्ण करून संबंधित युनिटमध्ये ‘सीसीटीएनएस’चा प्रायोगिक पातळीवर वापर सुरू केला आहे. प्रत्येक २ पोलिस ठाण्यांसाठी एक अभियंता काम पाहणार असून काही महिने तो कर्मचाऱ्यांना सीसीटीएनएसचे संपूर्ण प्रशिक्षण देणार आहे. पोलिसांचे अभिलेख अद्ययावत राहणे व कारकुनी कामात खर्ची होणारे मनुष्यबळ कायदा व सुव्यवस्थेसाठी वापरात आणण्याकरिता ही प्रणाली निश्चितच उपयोगी ठरत आहे. गुन्हा दाखल झाल्न्यापासून एफआयआर, जबाब नोंदवणे, चार्जशीट दाखले करणे, मिसींग, वॉन्टेड, फरार आरोपींची माहिती देणे ही कामे संगणकाच्या माध्यमातून होत आहेत. या कामासाठी प्रत्येक ठाण्यातील १ अधिकारी व ५ कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून तेच रिसोर्स पर्सन म्हणून काम पाहत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक कैलास कणसे यांनी दिली. हिंगोली जिल्ह्यातील एकूण १२ पोलिस ठाणे, ३ उपविभागीय अधिकारी कार्यालये असून मुख्यालयातील पोलिस अधीक्षक व अप्पर अधिक्षकांच्या कार्यालयासह संगणक कक्ष या प्रणालीने जोडण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस दलात ३ उपअधीक्षक, १३ निरीक्षक, १६ सहायक पोलिस निरीक्षक, ४० फौजदार, ८५ सपोउपनि, २४८ हेडकॉन्स्टेबल, २८८ पोलिस नाईक आणि शिपायांची ४४५ पदे मंजूर आहे. यातील अधिकाऱ्यांची काही पदे सध्या रिक्त आहेत. प्रत्येक पोलिस ठाण्यात ३ संगणक, २ प्रिंटर, मॉडेम, जनरेटर, इलेक्ट्रॉनिक पेन, डिजीटल कॅमेरा आदी साहित्य देण्यात आले आहे. ४५० पोलिसांना बेसिक रोल प्रशिक्षणानंतर स्वतंत्र युजर आयडी व पासवर्ड देण्यात आला आहे. सीसीटीएनएसमुळे पोलिसांच्या कामाला गती आली आहे. अधीक्षकांकडून प्रोत्साहन : रिवार्ड जाहीर पोलिस दलाचे कामकाज आॅनलाईन करण्यासाठी सीसीटीएनएस प्रणालीचा अवलंब केला आहे. जिल्ह्यातील १२ ठाण्यांसह एकूण १८ युनिटचा या प्रकल्पात समावेश केला आहे. सध्या हिंगोली शहर व ग्रामीण, वसमत शहर, कळमनुरी, सेनगाव, बासंबा, आखाडा बाळापूर, गोरेगाव, नर्सी, कुरूंदा, हट्टा ठाण्यात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. फिर्याद नोंदवण्यापासून चार्जशीट ते गुन्ह्याचा निकाल लागेपर्र्यंतची कामे आॅनलाईन केली जात आहेत. मात्र सदरचे काम संगणकीय कौशल्य असणाऱ्यांनाच जमत असल्याने इतर कर्मचारी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे उत्कृष्ट नोंदी घेणाऱ्यांना प्रत्येकी १ हजाराचे रिवार्ड पोलीस अधीक्षकांनी जाहीर केले आहे. यामुळे प्रोत्साहन मिळत आहे. अशी होत आहेत सर्व कामे.... सीसीटीएनएस प्रणालीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही गुन्हा दाखल झाला तर त्याची माहिती आॅनलाईन मिळणार आहे. या प्रणालीत राज्यातील ९५० पोलिस ठाणी एकमेकांशी जोडली जाणार असून त्यांचे सर्व रेकॉर्ड आॅनलाईन उपलब्ध राहणार आहे. या प्रणालीच्या १०० टक्के यशस्वी अंमलबजावणीनंतर भविष्यात पोलिसांचे कामकाज पेपरलेस होणार आहे. सर्व माहिती आॅनलाईन भरावयाची असल्याने पूर्वीप्रमाणे एफआरआर (प्रथम खबरी अहवाल), लेखी जवाब नोंदवणे, चार्जशीट दाखल करण्याची प्रक्रिया आदी कामे कागदाऐवजी संगणकावरच केली जाणार आहेत. तसेच वेगवेगळ्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या हातांच्या पंजाचे ठसे घेऊन त्याची माहिती आॅनलाईन उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे महाराष्ट्रात कुठेही गुन्हा घडला की त्या घटनेतील संबंधित सराईत गुन्हेगार कोण आहेत? याचा शोध घेण्यासाठी या माहितीचा उपयोग पोलिसांना होणार आहे. याशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्येक काम किंवा तपासाची अद्ययावत माहिती घेण्यासाठी संबंधितांकडे जाण्याऐवजी आपल्या कार्यालयात बसून माहिती मिळविण्यास मदत होणार आहे. विप्रो आणि बीएसएनएलच्या सहकार्याने पोलिस दलाने हा प्रकल्प राबविण्यास सुरूवात केली आहे. व्रिपो कंपनीकडून आॅनलाईन जोडण्याब्ाांबत तज्ज्ञांची मदत घेण्यात आली असून बीएनएनएलकडून इंटरनेटची कनेक्टिविटी घेण्यात आली आहे. या कामासाठी ६ संगणक अभियंते नेमण्यात आले आहेत. विप्रो आणि बीएसएनएलच्या सहकार्याने पोलिस दलाने हा प्रकल्प राबविण्यास सुरूवात केली आहे. व्रिपो कंपनीकडून आॅनलाईन जोडण्याब्ाांबत तज्ज्ञांची मदत घेतली असून बीएनएनएलकडून इंटरनेटची कनेक्टिव्हिटी मिळाली आहे. या कामासाठी ६ संगणक अभियंतेही नेमले आहेत.