शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधातील गुन्हा रद्द

By admin | Updated: July 31, 2016 01:08 IST

जालना : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह चार पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात अंबड (ता. जि. जालना) पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश

पुणे : बालेवाडी येथील हाय स्ट्रीटवरील पार्क्स एक्स्प्रेस सोसायटीच्या विनापरवाना मजल्याचा स्लॅब कोसळल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी अटक केलेल्या चौघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांच्याकडे या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी दोन आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समता चौधरी यांनी हा आदेश दिला. भावीन हर्षद शहा (वय ३४, रा. एनआयबीएम रोड, कोंढवा), संतोष सोपान चव्हाण (वय ३५ रा. विवेकनगर, आकुर्डी), ज्ञानेश्वर लक्ष्मण चव्हाण (वय ३५, रा. नवी सांगवी), श्रीकांत किसन पवार (वय ४४, रा. कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ भावीन शहा हे कॉन्ट्रॅक्टर इन्चार्ज आहेत, तर संतोष चव्हाण आणि ज्ञानेश्वर चव्हाण हे साईड इन्चार्ज आहेत़ पवार या ठिकाणी नोकरीला आहेत़ अधिक तपास करण्यासाठी त्यांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकील मिलिंद दातरंगे यांनी केली. संबंधित इमारतीची १३ व्या मजल्याची परवानगी घेण्यात आली होती का, याचा तपास करायचा आहे. कंपनीची रजिस्टर नोंदणी कागदपत्रे हस्तगत करायची आहेत. बांधकामासंदर्भातील करार हस्तगत करायचे आहेत. आरोपींच्या घराची झडती घ्यायची आहे. पार्क्स एक्स्प्रेस बांधकामासंदर्भातील असलेल्या परवानगी आणि इतर कागदपत्रे पालिकेकडून प्राप्त करायची आहेत, अशी मागणी सरकारी वकील दातरंगे यांनी केली. आरोपींतर्फे अ‍ॅड. सुधीर शहा आणि अ‍ॅड. नंदू फडके यांनी काम पाहिले. त्यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्यास विरोध केला. >बालेवाडी येथील पार्क्स एक्स्प्रेस सोसायटीचा स्लॅब कोसळल्यामुळे शुक्रवारी नऊ कामगारांचा मृत्यू झाला. कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक साहित्य न वापरल्यामुळे ही दुर्घटना घडल्याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी अटक करण्यात आलेल्या चौघांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते.