शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

लाच घेताना पकडताच पोलीस निरीक्षकाची बिघडली प्रकृती, न्यायालयाने दिली १६ ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 19:04 IST

गुन्हा दाखल न करण्यासाठी एका जणाकडून ३५ हजार रुपये लाच घेताना बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक वसीम हाश्मी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यानंतर रात्री उशीरा त्यांची प्रकृती बिघडली.दरम्यान, शुक्रवारी दुपारी विशेष न्यायालयाने त्यांना १६ आॅक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.

ठळक मुद्दे३५ हजार रुपये लाच घेताना पकडलेले निरीक्षक वसीम हाश्मी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यानंतर रात्री उशीरा त्यांची प्रकृती बिघडली.विशेष न्यायालयाने त्यांना १६ आॅक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.

औरंगाबाद, दि. १३ : गुन्हा दाखल न करण्यासाठी एका जणाकडून ३५ हजार रुपये लाच घेताना बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक वसीम हाश्मी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यानंतर रात्री उशीरा त्यांची प्रकृती बिघडली. रक्तदाब वाढल्याने त्यांना घाटीत दाखल करण्यात आले. दुपारी त्यांचा रक्तदाब सामान्य होताच डॉक्टरांनी त्यांना डिस्चार्ज दिला. दरम्यान, शुक्रवारी दुपारी विशेष न्यायालयाने त्यांना १६ आॅक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.

गुरूवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बेगमपुरा ठाण्यात एका जणाकडून ३५ हजार रुपये लाच घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत असताना हाश्मी यांचा रक्तदाब वाढला. यानंतर पोलिसांनी त्यांना घाटीतील वॉर्ड क्रमांक ५ मध्ये दाखल केले. गार्डच्या निगराणीखाली त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दुपारी डॉक्टरांनी त्यांना घाटीतून डिर्स्चाज केला. 

यानंतर एसीबीच्या पोलिसांनी त्यांना रितसर अटक करून विशेष न्यायालायाचे न्यायाधीश जे.एन.राजे यांच्यासमोर हजर केले. यावेळी तपास अधिकारी उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांनी न्यायालयास सांगितले की, आरोपी हाश्मी यांच्या घराची रात्री झडती घेण्यात आली. मात्र तेथे काहीही मिळाले नाही. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांची चौकशी करता आली नाही. त्यांची बँक खाती आणि मालमत्तेविषयी विचारपूस करायची असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती केली. पोलीस अधिका-यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने हाश्मीला १६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेशित केल्याची माहिती उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांनी दिली.

सुभेदारीत सुट ची घेतली झडतीसुभेदारी विश्राम गृहातील वेरूळ इमारतीत हाश्मी यांनी मे महिन्यापासून एक सुट बुक करून ठेवला होता. ते अधून मधुन त्या सुटमध्ये मुक्काम करायचे अशी माहिती पोलिसांना मिळाली. यामुळे त्यांच्या घराच्या झडतीसोबतच एसीबीच्या अधिका-यांनी सुभेदारी विश्रामगृहातील त्यांचा मुक्काम असलेल्या सुटची झडती घेतली. तेथे काय मिळाले, याबाबतची माहिती मात्र पोलिसांनी सांगितली नाही. पोलिसांनी सुभेदारी विश्रामगृहातील त्यांच्या मुक्कामाची नोंद असलेले रजिस्टर जप्त केले.