शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकसाहेब शिवीगाळ करतात, समाधान हेल्पलाइनवर पोलिसांची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:02 IST

औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातर्फे २०१७ पासून एम पोलीस मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आणि समाधान हेल्पलाइनच्या माध्यमातून व्हॉट्सॲपवर ऑनलाइन तक्रार करण्याची ...

औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातर्फे २०१७ पासून एम पोलीस मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आणि समाधान हेल्पलाइनच्या माध्यमातून व्हॉट्सॲपवर ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी उपलब्ध करण्यात आली. या तक्रारी प्राप्त झाल्यावर सात दिवसांत त्यांच्या तक्रारीवर काय कार्यवाही झाली याबाबतचा अहवाल तक्रारदार पोलिसांना ऑनलाइन पाठविला जातो. अत्यंत महत्त्वाच्या या प्लॅटफॉर्मचा पोलीस अधिकारी, कर्मचारी उपयोग करून घेत असल्याचे निदर्शनास आले. गत वर्षभरात जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत या औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना ५५ तक्रारी प्राप्त झाल्या. बदली हवी, जोखीम भत्ता मिळत नाही, कार्यालयातील क्लार्क निलंबन कालावधीतील वेतन निश्चिती करून देत नाही, जिल्हा बदली द्यावी, अनुकंपा तत्त्वावर नोकरीत सामावून घ्यावे, अशा स्वरूपाच्या बहुतेक तक्रारी आहेत.

वैजापूर तालुक्यातील एका पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलिसाचा लहान मुलगा मुत्रपिंडविकाराने त्रस्त होता. त्याच्यावरील उपचारांसाठी वारंवार रजा घेऊन औरंगाबादला येणे त्यांना परवडत नव्हते. ही बाब त्यांनी समाधान हेल्पलाइनच्या माध्यमातून पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या कानावर टाकली. तिची तक्रार वाचून पोलीस अधीक्षकांनी तिची तातडीने औरंगाबाद ग्रामीण पोलीस मुख्यालयात बदली केली. दुसऱ्या एका प्रकरणात अजिंठा ठाण्यात कार्यरत वाहनचालकाला एका पोलीस अधिकाऱ्याने शिवीगाळ केली होती. याविषयीची तक्रार त्यांनी समाधान हेल्पलाइनवर करताच त्या अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहनचालक पोलीस कॉन्स्टेबलला वारंवार विनंती करूनही पोलीस अधिकारी रजा देत नाही आणि त्यांच्यासोबत उर्मट वागतात अशी क्लीप व्हायरल झाली होती. या क्लीपची दखल घेऊन त्या अधिकाऱ्याची चौकशी सुरू करण्यात आली. समाधान आणि एम पोलीस हेल्पलाइन पोलिसांसाठी वरदान ठरल्याचे दिसत आहे.

=========

जानेवारी ते डिसेंबर २०२० मध्ये प्राप्त तक्रारी

जानेवारी - ११

फेब्रुवारी - ९

मार्च - १०

एप्रिल - ६

मे - ५

जून - ०

जुलै - ३

ऑगस्ट - १

सप्टेंबर - ०

ऑक्टोबर - ०

नोव्हेंबर - ६

डिसेंबर - ४

=============

कोट

एम पोलीस आणि समाधान हेल्पलाइनच्या माध्यमातून पोलीस कर्मचारी आमच्याकडे ऑनलाईन तक्रार करू शकतात. याशिवाय ते परवानगी घेऊन (आज्ञांकित दिवस) प्रत्यक्ष भेटू शकतात. कोरोना कालावधीत आम्ही झूम ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतली. त्यांच्या तक्रारीचा कमीत कमी तीन दिवसांत आणि जास्तीत सात दिवसांत निपटारा केला जातो. या वर्षभरात आम्ही कर्मचाऱ्यांसाठी आज्ञांकित दिनी ३०० वेळा भेटलो. कर्मचाऱ्याच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन निर्णय लगेच घेऊन प्रश्न सोडविला जातो.

=== मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण.