शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेत हेराफेरी करणाऱ्यास पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:05 IST

--------------------- प्राणघातक हल्‍ला करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी औरंगाबाद : पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्‍ला चढवून गंभीर जखमी केल्याच्या गुन्ह्यात ...

---------------------

प्राणघातक हल्‍ला करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

औरंगाबाद : पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्‍ला चढवून गंभीर जखमी केल्याच्या गुन्ह्यात

शेख समीर शेख नसीर आणि शेख वाजेद शेख चाँद या दोघांना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी दिले. सहायक सरकारी वकील एस.आर. ढोकरट यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

-----------

मोबाईल चोरास पोलीस कोठडी

औरंगाबाद : पीडब्ल्यूडी विभागाच्‍या अभियंत्‍याच्‍या खिशातील नऊ हजाराचा मोबाईल चोरणारा गणेश ऊर्फ रंभू वैभव काळे याला २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी बुधवारी दिले. सहायक सरकारी वकील किशोर जाधव यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

------------

एक लाख ८५ हजाराचा ऐवज चोरणाऱ्यास पोलीस कोठडी

औरंगाबाद : दारूसाठी पैसे न दिल्याने हॉटेल शांग्रीलाच्‍या मालकाला मारहाण करून त्‍यांची ५ तोळ्याची सोनसाखळी, रोख ५ हजार रुपये आणि मोबाईल असा सुमारे एक लाख ८५ हजाराचा ऐवज चोरणारा

मोहम्मद अनिस ऊर्फ बोक्या मोहम्मद हनिफ याला २४ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी दिले. सहायक सरकारी वकील म‍निषा गंडले यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

-------------

गांजाची तस्‍करी करणाऱ्यास पोलीस कोठडी

औरंगाबाद : गांजाची तस्‍करी करणारा मुराद खान महेबूब खान याला २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी बुधवारी दिले. सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

-----------------

तस्करी करणाऱ्या रिक्षा चालकाला पोलीस कोठडी

औरंगाबाद : अंमली पदार्थाची तस्करी करणारा रिक्षा चालक मोहसीन अली हाश्मी अयूब अली हाश्मी याला २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी बुधवारी दिले. सहायक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी सरकारतर्फे काम पाहिले.

----------

दागिने चोराला जामीन नाकारला

औरंगाबाद : घराच्‍या पाठीमागील दरवाजा तोडून ७० हजार ८५० रुपये किमतीचे दागिने चोरणारा

संतोष ऊर्फ मुक्या ऊर्फ बांग्या गणेश रामफळे याचा नियमित जामीन अर्ज मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी पी.पी. मुळे यांनी बुधवारी नामंज़ूर केला. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील मनिषा गंडले यांनी काम पाहिले.

----------

फसवणूक करणाऱ्याला सशर्त जामीन

औरंगाबाद : निजामाचा वंशज असल्याची थाप मारून फळ संशोधन केंद्राची जमीन विक्री करुन शिक्षकाची २५ लाखांची फसवणूक करणारा निजामाचा तोतया वंशज दिलशाद जहा ईमदाद जहा याला प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी बी.डी. तारे यांनी १५ हजाराच्‍या जातमुच,क्यासह अटी व शर्तींवर जामीन मंजूर केला.

आरोपीच्‍या वतीने ॲड. नीलेश घाणेकर यांनी काम पाहिले. त्‍यांना वर्षा घाणेकर (वाघचौरे), मानसी घाणेकर यांनी सहकार्य केले.

-------------------------------------------------------------