शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पावती फाडण्यातच पोलिसांची धन्यता

By admin | Updated: June 16, 2017 23:29 IST

परभणी :शिस्त लावण्याऐवजी वाहतूक पोलिसांकडून फक्त पावती फाडून पैसे जमा करण्यातच धन्यता मानण्यात येत असल्याचा प्रकार शुक्रवारी ‘लोकमत’ ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उजेडात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली असल्याने सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असताना विस्कळीत होणाऱ्या वाहतुकीला शिस्त लावण्याऐवजी वाहतूक पोलिसांकडून फक्त पावती फाडून पैसे जमा करण्यातच धन्यता मानण्यात येत असल्याचा प्रकार शुक्रवारी ‘लोकमत’ ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उजेडात आला आहे.परभणी शहरात वाहनांची वर्दळ वाढल्याने वाहतुकीची कोंडी होऊ नये, म्हणून शहर वाहतूक शाखेच्या वतीने सहा ठिकाणी फिक्स पॉर्इंट ठरविण्यात आले आहेत. यामध्ये शिवाजी चौक, छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, रेल्वेस्थानक, बसस्थानक, गांधी पार्क, जेल कॉर्नर या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्या जाते. गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागातून शहरामध्ये वाहनधारक मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत. त्यामुळे नारायणचाळ, बसस्थानक, रेल्वेस्थानक, अपना कॉर्नर, गांधी पार्क, शिवाजी चौक, अष्टभुजादेवी मंदिर यासह प्रमुख ठिकाणी वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे येथील वाहतुक सुरळीत करण्याऐवजी वाहतुक पोलीस येथे उपस्थित नसतात अशी वाहनधारकांची तक्रार होती. त्याअनुषंगाने ‘लोकमत’ने शुक्रवारी दोन पथके स्थापन करुन स्टिंग आॅपरेशन केले. एका पथकाने दुपारी १२.२५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पाहणी केली असता या ठिकाणी दोन पोलीस कर्मचारी वाहनधारकांकडून दंड वसुल करून पावती फाडताना दिसून आले. त्यानंतर वसमतरोडवरील वसंतराव नाईक पुतळा परिसरात १२.३५ वाजता पाहणी केली असता तेथेही एकही कर्मचारी दिसून आला नाही. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होताना निदर्शनास आले. त्यानंतर श्री शिवाजी महाविद्यालयासमोर १२.४५ वाजता पाहणी केली असता येथे एक पोलीस कर्मचारी ड्युटीवर असल्याचे पहावयास मिळाले. तेथून १.२० वाजता रेल्वेस्थानकासमोर पाहणी केली असता विरुद्ध दिशेने वाहने जाताना पहावयास मिळाली. आयकर कार्यालयासमोर दोन कर्मचारी वाहनधारकाकडून दंड वसूल करताना दिसून आले. उड्डाणपुलावर एरव्ही नेहमी ३ ते ४ पोलिसांचा घोळका उभा असतो. परंतु, शुक्रवारी १.३० वाजता एकही कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यानंतर १.४० वाजता जिंतूर रस्त्यावरील महाराणा प्रताप चौकात दोन कर्मचारी झालेल्या वाहतुकीची कोंडी सोडविताना निदर्शनास आले. २ वाजेच्या सुमारास नारायण चाळ परिसरात वाहतूक शाखेचा कर्मचारी कोंडी झालेल्या वाहनधारकांना वाट करुन देताना पहावयास मिळाला.दुसऱ्या पथकाने दुपारी १२.३९ वाजता बसस्थानक परिसरात पाहणी केली असता तीन पोलीस कर्मचारी एका जीपचालकाविरुद्ध कारवाई करून पावती फाडत असताना दिसून आले. गुजरी चौक, गांधी पार्क या वर्दळीच्या ठिकाणी ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी आढळून आला नाही. गुजरी चौकामध्ये वाहतुकीची कोंडी दिसून आली. शिवाजी चौकामध्ये एक महिला वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होत्या. पुढे नानलपेठ कॉर्नर परिसरात एकही पोलीस कर्मचारी नव्हता. या रस्त्यावरील लोखंडी ढापा उखडल्याने या मार्गावर वाहतूक संथगतीने होती. त्यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर १ वाजेच्या सुमारास साने चौकामध्ये पाहणी केली असता एकही पोलीस कर्मचारी नव्हता. तसेच पुढे वाहतूक पोलीस चौकी परिसरात एकही कर्मचारी नसल्याने ग्रॅन्ड कॉर्नर ते पोलीस चौकी दरम्यान वाहतूक विस्कळीत होती. मुख्य बाजारपेठ असलेल्या जनता मार्केटमध्ये दुपारी १.१० वाजता पाहणी केली असता शिवाजी चौकापर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे पादचाऱ्यांना व वाहनचालकांना यामध्ये अडकून पडावे लागले. दुपारी १.२१ मिनिटांनी वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक पुतळा परिसरात एकही पोलीस कर्मचारी आढळून आला नाही. तसेच दुपारी दीड वाजता कृषी विद्यापीठाच्या गेटसमोरही वाहतूक कर्मचारी नव्हता. या ठिकाणी काही मिनिटे वाहतूक विस्कळीत झाल्याचे पहावयास मिळाले. विशेष म्हणजे शहरातील एकाही ठिकाणची सिग्नल यंत्रणा सुरु नसल्याचे यावेळी दिसून आले.