शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

तिच्या स्पर्शाने म्हातारा तरूण झाला, काठाने का होईना, समुद्र फिरून आला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:49 IST

तिच्या स्पर्शाने म्हातारा तरूण झाला, काठा काठाने समुद्र फिरुन आला, अशा एकापेक्षा एक सरस कविता सादर करुन फ. मुं. शिंदे यांनी रसिक श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तिच्या स्पर्शाने म्हातारा तरूण झाला, काठा काठाने समुद्र फिरुन आला, अशा एकापेक्षा एक सरस कविता सादर करुन फ. मुं. शिंदे यांनी रसिक श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. ‘ती’ म्हणजे सत्तासुंदरी, ती म्हणजे लोकशाही, अशी एक ना अनेक ‘ती’ ची रुपे उलगडून दाखवत फ.मुं.नी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.जालना शहरातील सरस्वती भुवन प्रशालेच्या प्रांगणात ऊर्मी जालनाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘दुधात चांदणे सांडले’ या काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात डॉ. उल्हास उढाण आणि राज्याचे माजी सहकार आयुक्त डॉ. सुभाष माने यांना ‘ऊर्मी’चा यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपूर्वीच वरुणराजाने हजेरी लावल्याने संमेलन वर्गखोलीत पार पडले. संमेलनात प्रा. ज्योती स्वामी, प्रा. शशिकांत पाटील, शिवाजीराव कायंदे, इंद्रजित घुले, वनमाला पाटील यांनी सहभाग नोंदवला.फ.मुं. शिंदेंची ‘आपले मत मांडण्याची सोय राहिली नाही, जिव्हासोबत भांडण्याची सोय राहिली नाही. कसे कसे कोणी कोणी नित्य किती सैरभैर, दु:खात अश्रू सांडण्याची सोय राहिली नाही’ ही कविता उपस्थितांची दाद मिळवून गेली.प्रा. ज्योती स्वामी यांनी स्त्री मनाचा ठाव घेणारी ‘मी शोध घेते बाई मनाचा’ ही कविता सादर केली. प्रा. शशिकांत पाटील यांनी आपल्या कवितेतून शेतकरी आत्महत्येवर आसूड ओढले. तर शिवाजीराव कायंदे यांनी सद्यस्थितीतील शेती आणि शेतकरी जीवनावर कविता सादर केली. इंद्रजित घुले यांनी प्रेमावर कविता सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. वनमाला पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गोडवे गाणारी कविता सादर केली. संमेलनाचे नेटके सूत्रसंचालन कविवर्य जयराम खेडेकर यांनी केले. संमेलनाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी डॉ. राजन उढाण, डॉ. उल्हास उढाण, डॉ. प्रमोद डोईफोडे, प्रा. रंगनाथ खेडेकर, भाऊसाहेब घुगे, बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले, प्रा. नारायण बोराडे, शिवकुमार सोळुंके, अ‍ॅड. दीपक कोल्हे यांच्यासह रसिक श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.