परभणी : जिल्ह्यातील सद्य परिस्थिती आणि नागरिकांच्या समस्या लक्षात घेता शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी बहुजन समाज पार्टीने केली आहे़ बसपाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले असून, त्यात १८ मागण्या करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये परभणी जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, पोलिसांच्या सेवेचे तास निश्चित करावेत, पोलिसांना तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, महसूल कर्मचाऱ्यांना वेठबिगाराप्रमाणे राबविले जाते़ त्यांच्या सेवेचे तास निश्चित करावेत, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करावा, निराधारांच्या प्रत्येक वर्षी होणारी चौकशी रद्द करा, सर्व योजनेतील निराधार लाभार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपये अनुदान द्यावे, वयोवृद्ध कलावंतांची मंजुरीसाठी पाठविलेली यादी तत्काळ मंजूर करावी, लोककलावंतांना शहरी भागात गृहनिर्माण संस्थेच्या धरतीवर घरे बांधून द्यावीत, होमगार्डना शासकीय सेवेते सामावून घ्यावे, दारिद्रय रेषेचा सर्वे पुन्हा एकदा करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़ या मागण्या तत्काळ पूर्ण कराव्यात, अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष अशोक वायवळ व मराठा भाईचाराचे जिल्हाध्यक्ष डी़ एस़ कदम यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे़
शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करा
By admin | Updated: July 18, 2014 01:44 IST