शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

गावपुढार्‍यांची झाडाझडती !

By admin | Updated: May 22, 2014 00:13 IST

उस्मानाबाद : पाणीटंचाईच्या झळा सोसणार्‍या गावांना टंचाईच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी शासनाने कोट्यवधीच्या पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या.

उस्मानाबाद : पाणीटंचाईच्या झळा सोसणार्‍या गावांना टंचाईच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी शासनाने कोट्यवधीच्या पाणीपुरवठा योजना मंजूर केल्या. परंतु, या योजना सरपंच, समिती अध्यक्ष-सचिव आणि ग्रामसेवक यांच्या गोंधळात मागील तीन ते पाच वर्षापासून लटकल्या आहेत. अशा गावांची संख्या थोडी थोडकी नव्हे, १२६ इतकी आहे. सदरील योजनांचा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकार्‍यांसोबतच गावपुढार्‍यांचीही चांगलीच झाडाझडती घेतली. जे सरपंच, अध्यक्ष-सचिव कामे पूर्ण करणार नाहीत, त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करून ‘आरआरसी’ची कारवाई करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. एन. तांगडे यांना दिले आहेत. राज्याचे मुख्य सचिव आणि प्रधान सचिव (पाणीपुरवठा) यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी बुधवारी रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. बैठकीसाठी १२६ गावचे सरपंच, ग्रामसेवक, अध्यक्ष-सचिवांना बोलावण्यात आले होते. मात्र, नेहमीप्रमाणेच अत्यल्प उपस्थिती दिसून आली. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी गैरहजर असलेले सरपंच, अध्यक्ष-सचिव आणि ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गैरहजर मंडळी आता जिल्हाधिकार्‍यांच्या रडारवर आली आहे. निधी मंजूर होवून मागील तीने ते पाच वर्षापासून कामेच सुरू करण्यात आलेली नाहीत. अशा गावचे सरपंच, अध्यक्ष-सचिवांचा तर जिल्हाधिकार्‍यांनी चांगलाच समाचार घेतला. रखडलेल्या योजनांचे तातडीने पंचनामे करून सध्याच्या ‘डीएसआर’प्रमाणे रक्कम वसूल करण्याचे आदेश कार्यकारी अभियंत्यांना दिले. दरम्यान, सदरील रक्कम वूसल करण्याइतपत ‘त्या’ व्यक्तीच्या नावे मालमत्ता नसेल तर संबंधिताच्या पत्नीचा वाट्याला येणार्‍या माहेरच्या मालमत्तेचा लिलाव करून रक्कम वसूल करण्यात येईल, अशी तंबी दिली. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे काहीच मालमत्ता नसेल, अशा व्यक्तीला ‘नादार’ करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे उपस्थित गावपुढार्‍यांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाल्याचे दिसून आले. बहुतांश गावांतील पाणीपुरवठा समिती अध्यक्षांनी किमान एक ते कमाल चार महिन्यात कामे पूर्ण करू, अशी हमी दिली. बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, सूर्यकांत हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. (प्रतिनिधी) ...अन्यथा ‘त्या’ गावांना टँकर नाही कोट्यवधी खर्चाच्या योजना मंजूर करूनही त्या पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आजही संबंधित गावांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. याला त्या-त्या वेळचे सरपंच, पाणीपुरवठा समित्या, कर्मचारी जबाबदार आहेत. त्यामुळे ज्या गावांतील योजना पूर्ण झालेल्या नाहीत, त्या गावांना यापुढे टँकर देऊ नये, असे स्पष्ट निर्देशही त्यांनी यावेळी दिले. पंधरा दिवसांची ‘डेडलाईन’ पूर्वी एखाद्या गावाला पाणीपुरवठा योनजा हवी असल्यास ते गाव ६० टक्के हागणदारीमुक्त असणे आवश्यक होते. परंतु, आजही अनेक गावे ३० ते ३५ टक्केच हागणदारीमुक्त आहेत. त्यामुळे हागणदारीमुक्तीच्या टक्केवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हाही प्रकार जिल्हाधिकार्‍यांनी गांभीर्याने घेतला. योजनेतील सर्व गावे १०० टक्के हागणदारीमुक्त झाली पाहिजेत, असे सागंत प्रसाधनगृहाची कामे ईजीएसमधून करण्याची सूचना केली. रखडलेल्या योजनांचा पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, माजी खा. डॉ. पद्मसिंंह पाटील, आमदार, जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी आढावा घेतला. प्रत्येक बैठकांमध्ये गावपुढार्‍यांनी आश्वासन देऊन वेळ मारून नेली. मात्र, आश्वासन प्रत्यक्षात उतरले नाही. मात्र, आता हा प्रकार चालणार नाही, असे सुनावत संबंधितांकडून शंभर रूपयांच्या बाँड पेपरवर लेखी घ्या, असे निर्देश पाणीपुरवठा विभागाला दिले. जे सरपंच योजनेचे काम पूर्ण करणार नाहीत, त्यांना अपात्र ठरविण्याठीचा प्रस्तावही पाठवा, अशी सूचना केली.