शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’साठी नियोजनाची गरज...

By admin | Updated: September 20, 2014 00:28 IST

औरंगाबाद : आगामी काळात देशात ‘स्मार्ट सिटी’ उभारण्यासाठी नियोजनाची गरज आहे,

औरंगाबाद : आगामी काळात देशात ‘स्मार्ट सिटी’ उभारण्यासाठी नियोजनाची गरज आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अ‍ॅप्लिकेशन सेंटरचे संचालक डॉ. सुब्रता दास यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान विभागांंतर्गत ‘श्रीनिवास रामानुजन जिओस्पेशिअल चेअर’च्या वतीने शुक्रवार, दि.१९ सप्टेंबरपासून दोनदिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. दीप प्रज्वलनाने या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. दास यांच्या हस्ते झाले. ‘सेंट्रल फॅसिलिटी सेंटर’च्या सभागृहात आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे होते. यावेळी कुलसचिव डॉ. धनराज माने, ‘बीसीयूडी’चे संचालक डॉ. कारभारी काळे, प्राचार्य डॉ. सुधीर देशमुख, ‘निलीट’चे संचालक डॉ. रंजन माहेश्वरी, रामानुजन चेअरचे संचालक डॉ. एस.सी. मेहरोत्रा, विभागप्रमुख डॉ. रत्नदीप देशमुख, अद्वैत औंधकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ. सुब्रता दास बीजभाषणात म्हणाले की, देशामध्ये चंदीगड, ग्रेटर नोएडा ही आदर्श शहरे म्हणून ओळखली जातात. नियोजनबद्ध वसविण्यात आलेली शहरे म्हणून त्यांची ओळख आहे. शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. परिणामी, शहराच्या विस्तारीकरणात नियोजन नसल्यामुळे बेशिस्त घरे, झोपडपट्ट्या, पाणी, रस्ते, गटारांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. लोकांकडे मोबाईल, टीव्ही, वातानुकूलित गाड्यांसह सर्व सुविधा आल्या. लोकांनी तंत्रज्ञानामार्फत होत असलेले बदल स्वीकारले; पण लोकांना या बदलाचा ‘सिव्हिक सेन्स’ नसल्यामुळे नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. राज्य सरकारच्या नियोजन विभागामार्फत ‘रिमोट सेन्सिंग’संदर्भात यापुढे प्रत्येक जिल्ह्यात केंद्र स्थापन केले जाणार आहे. ‘जिओ स्पेशिअल’ या क्षेत्रात उज्ज्वल भवितव्य असून या क्षेत्रात संशोधन करण्याची विद्यार्थ्यांना चांगली संधी आहे. त्यांनी ‘अ‍ॅप्लिकेशन आॅफ रिमोट सेन्सिंग अँड जीआयएस फॉर टाऊन प्लॅनिंग’ या विषयावर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांना नियोजनबद्ध शहरांच्या विकासाची संकल्पना समजावून सांगितली. यावेळी डॉ. माहेश्वरी, कुलसचिव डॉ. माने, डॉ. काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. मेहरोत्रा यांनी केले. विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती डॉ. रत्नदीप देशमुख यांनी दिली. डॉ. मुक्ता धोपश्वरकर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. भारती गवळी यांनी आभार मानले. उद्या डेहराडून येथील ‘आयआयआरएस’चे संचालक डॉ. वाय.व्ही. कृष्णमूर्ती यांच्या उपस्थितीत या कार्यशाळेचा समारोप होणार आहे.