शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन समितीची रणधुमाळी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:34 IST

जिल्हा नियोजन समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थामधून पाठविण्यात येणाºया प्रतिनिधीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ झाली असून जिल्हा परिषदेचे ५ तर महापालिकेचे २ सदस्य वाढणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून मतदारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या मतदारयादीवर आक्षेपाची २३ आॅगस्ट ही अंतिम मुदत राहणार आहे.

अनुराग पोवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्हा नियोजन समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थामधून पाठविण्यात येणाºया प्रतिनिधीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ झाली असून जिल्हा परिषदेचे ५ तर महापालिकेचे २ सदस्य वाढणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून मतदारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या मतदारयादीवर आक्षेपाची २३ आॅगस्ट ही अंतिम मुदत राहणार आहे.नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या ४० सदस्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेऊन नियोजन समितीच्या सदस्यांमध्ये वाढ झाली आहे. ७ सदस्य वाढले असून त्यात जिल्हा परिषदेचे ५ तर महापालिकेचे २ सदस्य राहणार आहेत. नांदेड जिल्हा नियोजन समिती ही एकूण ५० सदस्यांची आहे. त्यात पालकमंत्री हे समितीचे अध्यक्ष तर जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, राज्यपाल नामनिर्देशीत १ सदस्य, विधिमंडळ नामनिर्देशीत सदस्य २ तसेच राज्य शासनाचे पदसिद्ध ४ सदस्य आहेत. तर उर्वरित सदस्य निवडून द्यावे लागणार आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे २८, नगरपरिषदांचे ४, महापालिकेचे २ आणि नगरपंचायतींमधून १ सदस्य निवडून द्यावयाचा आहे.या निवडणुकीसाठी नांदेड जिल्हा परिषद, नांदेड महापालिका, किनवट नगरपरिषद, हदगाव नगरपरिषद, मुदखेड नगरपरिषद, भोकर, उमरी, धर्माबाद, बिलोली, कुंडलवाडी, लोहा, कंधार, मुखेड आणि देगलूर नगरपरिषद तसेच अर्धापूर, माहूर, हिमायतनगर आणि नायगाव नगरपंचायतींमध्ये निवडून आलेल्या सदस्यांच्या नावाची प्राथमिक यादी १९ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.या मतदारयादीवर आक्षेप किंवा हरकत घ्यायची असेल तर त्यांना २३ आॅगस्टची अंतिम मुदत देण्यात आली आहे. मतदारयादी अंतिम होताच जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या अथवा दुसºया आठवड्यात या निवडणुका होतील, अशी चिन्हे आहेत.नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीतही काँग्रेस आपलाच वरचष्मा राखण्याचा प्रयत्न करणार आहे. तर विरोधक एकत्र येऊन काँग्रेसला रोखण्याची आपली नेहमीच खेळी खेळणार का? हाही प्रश्न पुढे आला आहे.