शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन समितीने सिग्नलसाठी दिलेले दीड कोटी धूळ खात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2016 00:46 IST

हणमंत गायकवाड ,लातूर जिल्हा नियोजन समितीने शहर वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून १४ सिग्नल्ससाठी १ कोटी ५३ लाख ३१ हजारांचा निधी मंजूर केला असून, हा निधी नगर विभागाकडे वर्गही करण्यात आला आहे.

हणमंत गायकवाड ,लातूरजिल्हा नियोजन समितीने शहर वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून १४ सिग्नल्ससाठी १ कोटी ५३ लाख ३१ हजारांचा निधी मंजूर केला असून, हा निधी नगर विभागाकडे वर्गही करण्यात आला आहे. मात्र मनपाने सिग्नलसाठी काढलेल्या निविदेला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने निधी धूळ खात पडून आहे. जिल्हा नियोजन समितीने लातूर शहरातील विविध चौकांत १४ सिग्नल्स बसविण्यासाठी १ कोटी ५३ लाख ३१ हजारांचा निधी फेब्रुवारी महिन्यात मंजूर केला. मंजुरीनंतर हा निधी जिल्हा नियोजन समितीकडून नगर विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. नगर विभागाकडून मनपाकडे हा निधी वर्ग झाला आहे. दरम्यान, शहरात दयानंद गेट, शिवाजी चौक, आदर्श कॉलनी, गूळ मार्केट, हनुमान चौक, विवेकानंद चौक, गांधी चौक, बसवेश्वर चौक आदी १४ ठिकाणी या निधीतून सिग्नल्स बसविले जाणार आहेत. प्रत्येक सिग्नलवर दहा ते पंधरा लाख रुपये खर्च केला जाणार आहे. त्यासाठी मनपाने निविदा मागविल्या होत्या. दोनवेळा निविदा मागितल्या. परंतु, दोनच कंपन्यांनी निविदा भरली. कमीत कमी तीन कंपन्यांच्या निविदा असणे आवश्यक आहे. मात्र येथे दोनच निविदा आल्याने फेरनिविदा काढण्यात आली. आता तिसऱ्यांदा फेरनिविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लातूर शहरात अशोक हॉटेल चौक, मिनी मार्केट चौक येथील दोनच सिग्नल सध्या सुरू आहेत. अन्य चौकांत सिग्नल चालू नाहीत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. नियमांचे उल्लंघन होते. शिस्त नसल्याने अपघातही होतात. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीने मनपाच्या प्रस्तावानुसार १ कोटी ५३ लाख ३१ हजारांचा निधी मंजूर करून तो वर्गही केला आहे. परंतु, निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने निधी पडून आहे. लातूर शहरात १४ सिग्नल्स बसविण्यासाठी नियोजन समितीने प्रस्तुत निधी मंजूर केला आहे. तो संबंधित विभागाकडे वर्गही झाला आहे. पुढील प्रक्रिया मनपाची आहे. आम्ही निधी दिला असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी कोलगणे यांनी सांगितले.