शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

त्आरोग्य केंद्रांना रिक्त पदांचे ग्रहणाु

By admin | Updated: December 20, 2015 23:48 IST

ळजापूर : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य सेवकांची देखील अनेक पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य

ळजापूर : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य सेवकांची देखील अनेक पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडल्याचे चित्र आहे. अनेक आरोग्य केंद्रातील सेवा ही प्रभारींवर चालत असून, रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी होत आहे.याबाबत माहिती अशी की, तालुक्यात मंगरूळ, सावरगाव, अणदूर, नळदुर्ग, जळकोट, काटगाव आणि सलगरा ही सात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरळी येथे नागरी दवाखान्यामार्फत ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविली जाते. या प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रत्येकी दोन जागा मंजूर आहेत. मात्र, सद्यस्थितीत काटगाव आणि सलगरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रत्येकी एकेक वैद्यकीय अधिकारी हे शिक्षणासाठी बाहेरगावी गेले असल्याने येथील भार एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांभाळावा लागत आहेत. आररी नागरी दवाखान्यातही अशीच परिस्थिती आहे. याशिवाय इतर पाच ठिकाणी तर वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदेच रिक्त असल्यामुळे तेथील कारभार प्रभारींवर सुरू आहे. अशा स्थितीत आरोग्य सेवा पुरविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, अनेक रुग्णांना नाविलाजास्तव खाजगी रुग्णालयात जावून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यासोबतच तालुक्यात ३२ उपकेंद्रे असून, यापैकी केशेगाव, उमरगा (चि), खुदावाडी, हंगरगा (नळ), सलगरा (म), खडकी, पिंपळा (खु), कुंभारी, होर्टी, शहापूर, काक्रंबा, जळकोटवाडी आणि आरळी अशा तेरा ठिकाणची आरोग्य सेवकांची पदेही रिक्त आहेत. त्यामुळे येथील कामही अतिरिक्त आरोग्य सेवकांमार्फतच चालू असल्याचे दिसते. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. जी. पी. बिलापट्टे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मंगरूळ येथील आ२ोग्य सेवकाकडे सध्या कुंभारी येथील अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. आरोग्य सेवकांची पदे भरण्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रक्रिया सुरू असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल. प्राथमिक आरोग्य केंद्रांना संरक्षक भिंत बांधण्यासाठी देखील टेंडर मागविण्यात आले असून, काही ठिकाणी कामे सुरूही झाली असल्याचे ते म्हणाले. (वार्ताहर) तालुक्यातील सात आरोग्य केंद्रांतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर २०१५ या आठ महिन्याच्या कालावधीत ९७२ महिलांची प्रसुती करण्यात आली. तर उपकेंद्रातील हा आकडा २९४ इतका आहे. तसेच याच कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्राची ओपीही ९२ हजारावर तर उपकेंद्राची ओबीडी २ हजार ७९५ एवढी झाली. प्राथमिक आरोग्य केंद्रात या आठ महिन्यात ५९९ महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया देखील करण्यात आल्या. असे असताना येथील रिक्त पदे भरण्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. शौचालयाची वानवा४तालुक्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात शौचालयाची सोय नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांसह रुग्ण व नातेवाईकांची देखील हेळसांड होत आहे. शिवाय काही ठिकाणी संरक्षक भिंत नसल्याने मोकाट जनावरांचा वावरही वाढल्याचे दिसते.