शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पळसवाडी उड्डाणपुलावरील खड्डा देतोय अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:04 IST

गल्ले बोरगाव : तीनच महिन्यांपूर्वी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पळसवाडी येथील उड्डाणपुलावर कन्नडकडे जाणाऱ्या मार्गावर मोठे भगदाड पडले आहे. याबाबत ...

गल्ले बोरगाव : तीनच महिन्यांपूर्वी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पळसवाडी येथील उड्डाणपुलावर कन्नडकडे जाणाऱ्या मार्गावर मोठे भगदाड पडले आहे. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच संबंधित विभागाकडून खड्डा बुजविण्यात आला. ते भगदाड बुजवून आठ दिवस होत नाही तोच पुन्हा उड्डाणपुलावर आणखी एक नवीन खड्डा पडला आहे. परिणामी हा खड्डादेखील अपघाताला निमंत्रण देत असून महामार्ग बांधकाम विभाग याकडे लक्ष देणार की नाही, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे.

कन्नडकडून औरंगाबादकडे जाताना उड्डाणपुलावर हा मोठा खड्डा पडला आहे. त्यात पावसाचे पाणी शिरल्यामुळे तो खड्डा आणखी मोठा होत आहे. एकीकडे मोठा खड्डा पडूनदेखील जडवाहतूक सुरूच आहे. हा खड्डा चुकविण्याच्या नादात या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महामार्ग विभागाच्या अभियंत्यांनी या पुलाची त्वरित दुरूस्ती करावी. अन्यथा रस्ता बंद करून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पंचायत समितीचे उपसभापती युवराज ठेंगडे, चेअरमन नारायण बर्डे, सरपंच भेंडे, संजय फुलारे, किशोर जाधव, धनराज जोनवाल, कैलास म्हसरुप यांनी दिला आहे.

-----

पुलाचे बांधकाम बोगस झाल्याचा आरोेप

पळसवाडी शिवारात मागील आठवड्यात जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी उड्डाणपुलावरील पाणी वाहत जाऊन थेट आजूबाजूच्या घरांमध्ये शिरले होते. त्यामुळे पुलावरील पाण्याचे नियोजन करण्यात आले नाही. वेळोवेळी जागोजागी खड्डे पडू लागले आहेत. उड्डाणपूलाची नव्याने बांधण्यात आलेली संरक्षण भिंत देखील धोकादायक झाली आहे. संरक्षक भिंतीजवळ खड्डे पडले आहेत. भिंतीला बसविण्यात आलेल्या सिमेंट प्लेट्स बाहेरच्या बाजूला झुकल्या आहेत. त्यामुळ‌े कधीही दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामु‌ळे या पुलाचे कामच बोगस झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

----