शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी पालिकेचे अ‍ॅप..!

By admin | Updated: January 17, 2017 00:39 IST

जालना : शहरातील वाढत्या कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी नगर पालिकेने पुढाकार घेतला आहे.

जालना : शहरातील वाढत्या कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी नगर पालिकेने पुढाकार घेतला आहे. शहर स्वच्छतेची माहिती तात्काळ मिळावी म्हणून पालिका नवीन मोबाईल अ‍ॅप्लीकेशन सुरू करत आहे. यासंबंधीची मुंबई येथील एका एजन्सीसोबत चर्चा झाली. तर घंटागाड्यासह स्वच्छता वाहनांवर जीपीएस यंत्रणाही लवकरच कार्यान्वित होणार आहे. सोमवारी नगर पालिकेत मुख्याधिकारी व संबंधित जीपीएस यंत्रणा पुरविणाऱ्या एजन्सीच्या अधिकाऱ्यांसोबतच चर्चा झाली. यात जीपीएस यंत्रणा कशी कार्यान्वित होईल. या संबंधिची संगणक तसेच मोबाईलवर माहिती देण्यात आली. जीपीएस यंत्रणेचा रोड मॅप सोबतच लोकेशनही तात्काळ कळणार आहे. सर्व जीपीएस यंत्रणा नगर पालिकेतील सर्व्हर तसेच मुख्याधिकाऱ्यांच्या मोबाईलमध्ये कार्यान्वित असणार आहे. जीपीएस यंत्रणेसाठी आॅनलाईन टेंडर प्रक्रिया सुरू झाली आहे. नेमका खर्च किती आहे याबाबत सभागृहाच्या निर्णयावरच ठरणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी सांगितले. संबंधित एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी गुगल मॅपद्वारे ही सर्व प्रक्रिया कशी पार पडेल याबाबत माहिती दिली. येत्या काही दिवसांत प्रत्येक घंटागाडी तसेच स्वच्छता वाहनांवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित होईल. सोबतच शहरातील घंटागाड्यांची माहिती नागरिकांना मिळावी, पालिकेचे मुख्याधिकारी तसेच स्वच्छता विभागातील अधिकाऱ्यांनाही शहर स्वच्छतेबाबतची वास्तव स्थिती कळावी म्हणून पालिका मोबाईल अ‍ॅप्लीकेशन तयार करत आहे. याबाबतही तंत्रज्ञासोबत चर्चा झाली असून, पालिकेच्या या हायटेक कामामुळे शहर स्वच्छ व सुंदर होणार असे चित्र आहे.