शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये रंगणार राज्य पिकलबॉलचा धडाका

By admin | Updated: September 23, 2016 04:14 IST

औरंगाबाद जिल्हा क्रीडा संकुलामध्ये २४ व २५ सप्टेंबरदरम्यान पाचव्या राज्यस्तरीय पिकलबॉल स्पर्धेची रंगत रंगणार आहे.

मुंबई : औरंगाबाद जिल्हा क्रीडा संकुलामध्ये २४ व २५ सप्टेंबरदरम्यान पाचव्या राज्यस्तरीय पिकलबॉल स्पर्धेची रंगत रंगणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच औरंगाबादमध्ये होत असलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यभरातून २७ संघ सहभागी होत आहेत.महाराष्ट्र राज्य पिकलबॉल संघटनेच्या मान्यतेने औरंगाबाद जिल्हा पिकलबॉल संघटनेच्या वतीने होत असलेल्या या स्पर्धेत पुरुष व महिला गटात सामने पार पडतील. याआधी अहमदनगर, मुंबई, जळगाव आणि सांगली येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत औरंगाबादने जबरदस्त वर्चस्व राखले होते. त्यामुळेच यंदा यजमान असलेल्या औरंगाबादच्या कामगिरीवर सर्वांचेच विशेष लक्ष असेल. त्याशिवाय, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी सुवर्ण कामगिरी केलेल्या अतुल एडवर्ड व मनिष राव यांचाही प्रवेश निश्चित झाल्याने स्पर्धकांमध्ये उत्सुकता आहे. अतुल मुंबई उपनगर, तर मनिष राव शहरचे प्रतिनिधित्व करणार असल्याने मुंबईकरांचे तगडे आव्हान स्पर्धेत असेल. खुल्या व १७ वर्षांखालील गटाच्या या स्पर्धेत एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी अशा लढती होतील. तसेच या स्पर्धेतून नोव्हेंबर महिन्यात जयपूर येथे होणाऱ्या चौथ्या राष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड होणार असल्याने स्पर्धेत मोठी चुरस पाहायला मिळेल. (क्रीडा प्रतिनिधी)उत्सुकता राज्य संघ निवडीची...या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाची निवड होणार असल्याने बलाढ्य संघांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळेल. स्पर्धेतील सहभागी संघ...अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, जालना, जळगाव, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, लातूर, सांगली, धुळे, नागपूर, यवतमाळ, नंदुरबार, वर्धा, परभणी, बीड, अमरावती, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नांदेड, हिंगोली, भंडारा, अकोला आणि वाशिम.