शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासन लोकशाहीवर स्वार झाल्याचे चित्र

By admin | Updated: June 12, 2014 01:40 IST

जालना : नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्षांनी नागरी प्रश्नांसंदर्भात दाखविलेल्या हतबलपणामुळेच पालिका प्रशासन हे लोकशाहीवर स्वार झाल्याचे चित्र समोर आले

जालना : नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्षांनी नागरी प्रश्नांसंदर्भात दाखविलेल्या हतबलपणामुळेच पालिका प्रशासन हे लोकशाहीवर स्वार झाल्याचे चित्र समोर आले असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे यांनी व्यक्त केले. एक दिवसाचासुध्दा पालिकेच्या कामाचा अनुभव नाही. असे असतानासुद्धा थेट ‘अ’ वर्गामध्ये पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा बाबासाहेब मनोहरे यांना पदभार कसा काय दिला? असा सवाल चिन्नादोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे व्यक्त केला. शासनाकडून मनोहरे यांची नियुक्ती झाली असताना त्यांना कोणताही अनुभव नसताना पालिका प्रशासनाने रूजू करून का घेतले? मुख्याधिकाऱ्यांची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त ठरली असतानासुद्धा त्यांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी अविश्वास ठराव का आणला नाही? असे प्रश्न आता जनतेसमोर पडू लागले असल्याचे चिन्नादोरे यांनी म्हटले.पालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोणताही विरोध न होता सर्वानुमते ठराव का घेतले जातात, असा आरोप करीत, चिन्नादोरे यांनी या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यकाळात जायकवाडी -जालना पाणीपुरवठा योजनेत अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली असतानासुद्धा संबंधित कंत्राटदाराची बिले काढण्यासाठी पालिका प्रशासनाने घाई-गडबड दाखविल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण शहर अंधारात आहे. ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गटारी तुंबल्या आहेत. पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. यासह अन्य प्रश्नही भयावह झाले आहेत. असे असतांना मुख्याधिकारी मूग गिळून गप्प आहेत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी पालिकेअंतर्गत अनागोंदी कारभाराच्या विरोधात ओळीनेही बोलण्याची भूमिका घेतली नाही. हेच लोकप्रतिनिधी आता भयावह झालेल्या प्रश्नांविरोधात रस्त्यावर येऊन झगडणार का? असा सवाल चिन्नादोरे यांनी व्यक्त केला.