शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आज स्पष्ट होणार अंतिम लढतीचे चित्र

By admin | Updated: February 6, 2017 22:57 IST

लातूर :मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. या मुदतीत अपक्षांसह नाराजांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी म्हणून पक्ष प्रमुखांकडून मनधरणी सुरू आहे.

लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या अनेक इच्छुकांसह अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जि.प. गटाच्या ५८ जागांसाठी ५१५ आणि पं.स.च्या ११६ जागांसाठी ८२६ उमेदवारी अर्ज आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. या मुदतीत अपक्षांसह नाराजांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी म्हणून पक्ष प्रमुखांकडून मनधरणी सुरू आहे. या मनधरणीस कितपत यश येते, हे दुपारनंतर स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. राजकीय पक्षांच्या अनेक इच्छुकांबरोबर स्थानिक आघाड्या व अपक्षांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे एका पक्षाचे दोन-दोन उमेदवार अनेक गटांतून आहेत. बंडाच्या तयारीत असलेल्या या उमेदवारांची उमेदवारी अंतिम राहते की, ते रिंगणातून माघार घेतात, यासाठी मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पक्ष प्रमुखांकडून मनधरणी सुरूच असून, अन्य पदांची आमिषे दाखवून त्यांना भुलविण्याचाही प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे उद्या दुपारी नेमके काय होणार? कोणत्या गटांमध्ये कोण आणि कोणत्या गणांमध्ये कोण? याचे अन् लढतीचेही चित्र स्पष्ट होईल.