शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

‘ब्रेक फेल’ होऊन पिकअप उलटली; सात भाविक जखमी

By admin | Updated: May 2, 2017 23:38 IST

परंडा : कर्जत तालुक्यातील गुरूपिंपरी येथून येरमाळा येथील येडाई देवीच्या दर्शनाला निघालेल्या पिकअप वाहनाचा ब्रेक फेल होऊन ती उलटल्याने सातजण जखमी झाले.

परंडा : कर्जत तालुक्यातील गुरूपिंपरी येथून येरमाळा येथील येडाई देवीच्या दर्शनाला निघालेल्या पिकअप वाहनाचा ब्रेक फेल होऊन ती उलटल्याने सातजण जखमी झाले. ही घटना परंडा-सोनारी रस्त्यावरील विद्युत उपकेंद्राजवळ सोमवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील गुरुपिंपरी येथील गंगावणे कुटूंबीय मिरजगाव येथे पाहुण्यांचा साखरपुड्याचा कार्यक्रम करून पिकअपमधून (क्र. एमएच ०५/ बीएच ३९२६) परंडा मार्गे येरमाळा येथील येडाई देवीच्या दर्शनासाठी जात होते. सोनारी-परंडा रोडवरील २२० केव्ही उपकेंद्राजवळ आल्यानंतर वाहनाचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यामुळे हे वाहन रस्त्याच्या खाली जाऊन उलटले. यामध्ये औसाबाई भागवत गंगावणे (वय ७०), रुपेश वसंत वाघमारे (वय ३२), आशाबाई गंगावणे (वय ४०), पप्पु गंगावणे (वय ५०), नंदाबाई गंगावणे (वय ४०), बंडू साळुंके वय (४०) व ड्रायव्हर गणेश गंगावणे (वय ४०) हे जखमी झाले. जखमींवर परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.(वार्ताहर)