शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

वक्फ बोर्ड अधिनियमाच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका निकाली

By admin | Updated: January 23, 2017 22:26 IST

वक्फ बोर्ड सुधारणा अधिनियम २०१३ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 23  - वक्फ बोर्ड सुधारणा अधिनियम २०१३ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. एम. कानडे व न्या.व्ही . के . जाधव यांनी निकाली काढली आहे . परिणामी सुधारीत कायद्यानुसार वक्फ न्यायधिकरणासाठी न्यायाधीशांसह एक प्रशासकीय अधिकारी आणि मुस्लिम कायद्याची माहिती असलेले एक तज्ज्ञ अशा त्रिसदस्यीय समितीची तरतूद कायम झाली आहे.वक्फ बोर्ड कायद्यानुसार पूर्वी महाराष्ट्र वक्फ न्यायधिकरण एक सदस्यीय होते. वक्फ कायद्याच्या कलम ८३ च्या ४ (अ), (ब), (क) नुसार नवीन सुधारणा कायदा लागू झाला आहे. या कायद्यानुसार न्यायधिकरणासाठी न्यायाधीशांसह एक प्रशासकीय अधिकारी आणि मुस्लिम कायद्याची माहिती असलेले एक तज्ज्ञ अशा त्रिसदस्यीय समितीची तरतूद करण्यात आली आहे. ह्यअ‍ॅडव्होकेट्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र स्टेट वक्फ ट्रायब्यूनल' तर्फे अब्दुल हमीद देशमुख यांनी खंडपीठात सुधारीत कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिले होते . पूर्वीच्या एक सदस्यीय न्यायधिकरणाला चांगल्या पद्धतीने काम करता येत होते. मात्र नवीन कायद्यानुसार त्रिसदस्यीय समितीतील बिगर न्यायिक सदस्यांमुळे न्यायिक कामकाजात अडथळे निर्माण होतील, त्यामुळे मूळ हेतू असफल होईल, असे याचिकेत म्हटले होते . प्राथमिक सुनावणीत खंडपीठाने प्रतिवादी केंद्र शासनाचे विधी व न्याय मंत्रालय, अल्पसंख्यांक मंत्रालय, राज्याचे मुख्य सचिव आणि अल्पसंख्यांक विभागाचे प्रधान सचिव यांना नोटीस बजावल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र वक्फ न्यायधिकरणावर बहुसदस्यीय समिती नेमण्ययाचे आदेश दिले आहेत .या याचिकेतील मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात चर्चा झाली नाही असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते . वरिष्ठ न्यायालयाने निर्णय घेतला असताना दुसऱ्या न्यायालयाने निर्णय घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही. याचिकाकर्त्याने अतिरिक्त मुद्दे मांडण्याचा प्रश्नच येत नाही असे निरीक्षण नोंदवून जनहित याचिका निकाली काढली. याचिकार्त्यांकडून अ‍ॅड. विनायक देशमुख, अ‍ॅड. जे. एच. देशमुख, केंद्र शासनातर्फे असिस्टन्ट सॉलिसीटर जनरल संजीव देशपांडे आणि राज्य शासनातर्फे सरकारी वकील अमरजितसिंग गिरासे यांनी बाजू मांडली .