शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

अमित देशमुख यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका फेटाळली

By admin | Updated: January 13, 2017 00:36 IST

लातूर : लातूर शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित देशमुख यांच्या निवडीला पराभूत उमेदवार अ‍ॅड़ अण्णाराव पाटील यांनी आव्हान देणारी याचिका दाखल केली होती़

लातूर : लातूर शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित देशमुख यांच्या निवडीला पराभूत उमेदवार अ‍ॅड़ अण्णाराव पाटील यांनी आव्हान देणारी याचिका दाखल केली होती़ दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकूण ही याचिका फेटाळली आहे़ २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत लातूर शहर विधानसभा मतदार संघातून २ लाख ३ हजार ४५३ वैध मतांपैकी १ लाख १९ हजार ६५३ विक्रमी मते घेऊन अमित देशमुख विजयी झाले होते़ या निवडणुकीत फक्त ४०० मते घेवून अनामत रक्कम जप्त झालेले पराभूत उमेदवार अ‍ॅड़ पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आमदार अमित देशमुख यांच्या निवडीला आव्हान दिले होते़ निवडणूक आयोगाने दिलेल्या मर्यादेपेक्षा देशमुख यांनी जास्तीचा खर्च केला, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते़ या कारणास्तव आमदारकी रद्द करावी, अशी विनंती याचिकेत केली होती़ याचिकेत मोघम स्वरूपाचे आरोप करण्यात आल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १८ एप्रिल २०१६ रोजी याचिका फेटाळून लावली़ दरम्यान उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला त्यांनी आव्हान देत पुन्हा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली़ सदरील प्रकरणात आ़ अमित देशमुख यांनी अ‍ॅड़ दिलीप तौर यांच्या मार्फत हजर होऊन शपथपत्र दाखल केले़ सदर प्रकरणी १२ जानेवारी २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्या़ गोगई व न्या़ भूषण यांच्या खंडपीठासमोर अंतिम सुनावणी झाली़ सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकूण घेतल्यानंतर उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवीत याचिका फेटाळली़ याप्रकरणात आ़ अमित देशमुख यांची बाजू अ‍ॅड़ केक़े़ वेणुगोपाल व अ‍ॅड़ दिलीप तौर यांनी मांडली़ तर याचिकाकर्त्यांची अ‍ॅड़ शेखर नाफडे यांनी बाजू मांडली़ आ़देशमुख यांची निवड रद्द करण्यासाठी योग्य ते कारण आणि माहिती सादर करण्यास याचिकाकर्त्यांना शक्य झाले नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने याचिका खारीज केली़