शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

‘पैठणी’साठी पावणेदोन कोटींचे क्लस्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:40 IST

पैठणीला पुनर्वैभव प्राप्त व्हावे, या उद्देशाने १ कोटी ७५ लाख रूपयांच्या निधीचे पैठणी क्लस्टर मंजूर करण्यात आले असून या वर्षी २९ लाख रूपयांच्या निधीची तरतूद यासाठी करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : पैठणीला पुनर्वैभव प्राप्त व्हावे, या उद्देशाने १ कोटी ७५ लाख रूपयांच्या निधीचे पैठणी क्लस्टर मंजूर करण्यात आले असून या वर्षी २९ लाख रूपयांच्या निधीची तरतूद यासाठी करण्यात आली असल्याची घोषणा वस्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सोमवारी येथे केली. पैठणी साडी विणण्याची पारंपरिक कला जोपासणाºया पैठणी विणकरांना हक्काची घरे देण्यासाठी जागेचा प्रस्ताव तातडीने सादर करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.पैठण येथे राष्ट्रीय हातमाग दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळाच्या पैठण येथील मराठी पैठणी सेंटर येथे वस्त्र मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीने राष्ट्रीय हातमाग दिवस विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार संदीपान भुमरे, नगराध्यक्ष सूरज लोळगे, माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे, नगरसेवक तुषार पाटील, सतीश पल्लोड, अलका मांजरेकर, नीना बनसोड, डी. ए. कुलकर्णी, एस. एम. स्वामी, आर. एम. परमार, शिवा पारिख, भूषण कावसानकर, ईश्वर दगडे, नाथ पोरवाल, विशाल पोहेकर, राणा मापारी, कृष्णा मापारी आदी मान्यवर उपस्थित होते.वस्त्र मंत्रालयाचे उपसचिव आर. एम. परमार यांनी प्रास्ताविक करून राष्ट्रीय हातमाग दिनाबाबत माहिती देऊन हा दिन साजरा करण्याचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांनी पैठणच्या विणकरांना राजाश्रय मिळाला पाहिजे, त्यांना घर उपलब्ध करून द्यावेअशी मागणी केली. भुमरे यांनी यावेळी विणकरांच्या समस्या मंत्री महोदयांसमोर मांडल्या.राज्यातील पहिली रेशीमबाजारपेठ जालन्यातराज्यातील पैठणी विणकरांना रेशीम खरेदी करण्यासाठी व शेतकºयांना विकण्यासाठी बेंगळुरू येथे जावे लागते. राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयामुळे कृषीबरोबरच राज्यात रेशीम निर्मितीसाठी तुती लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.यामुळे रेशीमची राज्यातील पहिली बाजारपेठ जालना येथे उभारण्यात येत असल्याची माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली. या बाजारपेठेचा फायदा घेण्यासाठी शेतकºयांनी तुतीची लागवड वाढवावी, असे आवाहन खोतकर यांनी केले.पैठण तालुक्यात रेशीम कारखाना उभारण्यासाठी आमदार संदीपान भुमरे यांनी प्रस्ताव द्यावा, तो प्रस्ताव दोन मिनिटात मंजूर करण्यात येईल, अशी घोषणा खोतकर यांनी यावेळी केली.खोतकर पैठणचे जावईखोतकर हे पैठणचे जावई व नगरसेवक तुषार पाटील यांचे मेव्हणे आहेत. पैठण येथे सोमवारी शासकीय कार्यक्रम झाल्यानंतर खोतकर हे पैठण शहरात पाहुणे म्हणूनच वागले. कार्यकर्ते, पत्रकार, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्याशी मनमोकळी चर्चा केली.जाता जाता परत विणकरांच्या घराच्या प्रस्तावाबाबत नगरसेवक तुषार पाटील यांना पाठपुरावा करा असा सल्ला दिला. पैठण शहरातील नागरिकांशी खोतकर यांनी आपुलकीने संवाद साधत पैठणकरांचे मन जिंकून घेतले.