लातूर : ‘लोकमत’ व सुयश इंग्लिश अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने १७ एप्रिल रोजी दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी ४ वाजता व्यक्तीमत्व विकास व इंग्रजी कौशल्य कार्यशाळा या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे़ कार्यशाळेमध्ये ‘व्यक्तीमत्व विकास व आधुनिक इंग्रजी कौशल्यतंत्र’ यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे़ यासोबतच ब्रेन मॅपिंग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन होणार आहे़ प्रत्येक मनुष्य जन्मात काही विलक्षण क्षमता घेऊन आलेला असतो़ त्या क्षमता ओळखण्याच्या शास्त्राचा प्रगत युरोपीयन देशामध्ये मोठ्या प्रमाणात वापर होत आहे़ त्यामुळे पाश्चिमात्य देश सर्वच क्षेत्रात पुढे आहेत आणि याच शास्त्राची ओळख या कार्यक्रमात होणार आहे़ कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून इंग्लिश अकॅडमीचे संचालक प्रा़बी़एऩरेड्डी व मार्इंड कोच जिगनेश टन्ना हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत़ त्यामुळे लोकमत सखीमंच, युवा नेक्स्ट व बालविकास मंच सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
व्यक्तीमत्व व इंग्रजी कौशल्य कार्यशाळा
By admin | Updated: April 17, 2015 00:40 IST