शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चिकाटी, दृढनिश्चिय, सकारात्मकतेमुळेच यश शक्य

By admin | Updated: August 15, 2014 00:02 IST

परभणी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत हमखास यश मिळतेच, असे लोकेशकुमार जांगिड यांनी ‘सांगितले.

परभणी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविण्यासाठी चिकाटी, दृढनिश्चिय व सकारात्मक दृष्टीकोन बाळगला तर हमखास यश मिळतेच, असे या परीक्षेत नुकतेच यश मिळविलेल्या परभणी येथील लोकेशकुमार जांगिड यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल जूनमध्ये जाहीर झाला. या परीक्षेत परभणी येथील रहिवासी असलेल्या लोकेशकुमार रामचंद्र जांगिड यांनी देशपातळीवर ६८ वा रँक मिळविला. लोकेशकुमार यांना यामुळे आयएएसचे कॅडर मिळाले आहे. त्यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली असता त्यांनी त्यांच्या यशाचे गमक सांगितले. लोकेशकुमार यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण परभणी येथील मॉडेल इंग्लिश स्कूल येथे झाले असून ११ व १२ वीचे शिक्षण त्यांनी बालविद्यामंदिर येथून घेतले आहे. त्यानंतर त्यांनी नांदेड येथील गुरु गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेकचे शिक्षण घेतले. ११ वीपासूनच त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सेवेत जाण्याची इच्छा होती. त्या दृष्टीकोनातून त्यांनी तशी तयारी केली. २००८ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्ली येथे खाजगी शिकवणी लावून या परीक्षेची तयारी सुरु केली. २००९ मध्ये झालेल्या आयोगाच्या परीक्षेत त्यांनी लोकप्रशासन व समाजशास्त्र हे विषय घेऊन देशपातळीवर ९१० वा रँक मिळविला. त्यामुळे त्यांची दिल्ली- अंदमान निकोबार आयलॅन्ड सिव्हील सर्व्हिसेससाठी निवड झाली. असे असले तरी त्यांचे लक्ष आयएएसकडेच होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा परीक्षेत प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश मिळाले नाही. अंदमानमध्ये समाजकल्याण संचालक म्हणून नोकरी करीत असताना त्यांनी पुन्हा चौथ्यांदा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांना यश आले व जूनमध्ये जाहीर झालेल्या निकात त्यांना ६८ रँक मिळाला. त्यामुळे आता त्यांना आयएएस कॅडर मिळणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)जुलैमध्ये जांगिड हे प्रशिक्षणासाठी मसुरी येथे जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी ते परभणीत आले असता त्यांनी लोकमत कार्यालयास भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंनी कसलाही न्यूनगंड न बाळगता लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करावी. यासाठी चालू घडामोडी, वृत्तपत्राचे वाचन, सखोल अभ्यास, राज्यसभा, लोकसभा टीव्हीवरील बातम्या आणि चर्चासत्र पहावे. बीबीसी वेबसाईडवरील बातम्या व इंटरनेटवर स्पर्धा परीक्षा विषयक असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती घ्यावी. केंद्र शासनाच्या पीआयबी वेबसाईडवरील माहिती घेऊन यशस्वी विद्यार्थ्यांच्या ब्लॉगचे वाचन करावे. जेणेकरुन त्यांना प्रेरणा मिळेल. परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासाचे नियोजन करुन त्यामध्ये सातत्य ठेवावे. चिकाटी असावी. सकरात्मक दृष्टीकोनातून विचार केल्यास निश्चितच यश मिळविता येते, असेही जांगिड म्हणाले.