शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांना शाश्वत वीज देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:12 IST

सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून राज्यातील चाळीस लाख शेतकºयांना २०१९ पर्यंत शाश्वत वीज जोडणी देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून राज्यातील चाळीस लाख शेतकºयांना २०१९ पर्यंत शाश्वत वीज जोडणी देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.महावितरणच्या दीनदयाल उपाध्यय ग्रामज्योती व एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत ३३ केव्ही उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी येथील मातोश्री लॉन्समध्ये ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, नारायण कुचे, संतोष दानवे, जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, माजी. आ. विलास खरात, अरविंद चव्हाण, कैलास गोरंट्याल, रामेश्वर भांदरगे, भास्कर दानवे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता कैलास हुमणे उपस्थित होते.ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, मागील काळात मराठवाडा व विदर्भावर वीजपुरवठ्याबाबत अन्याय झाला. युती सरकारने तीन वर्षात तीन लाख प्रलंबित जोडण्यांचे काम पूर्ण केले. जालना जिल्ह्यात १४ हजार शेतकºयांना जोडण्या दिल्या. विजेचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी दोन वर्षात महावितरण व महापारेषणच्या माध्यमातून जिल्ह्यात दोनशे कोटींची कामे होणार आहेत. जालना व परभणी जिल्ह्यात काम करताना गुत्तेदार तक्रारी करतात. त्यामुळे मंजूर कामे कशी पूर्ण होतील यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. जिल्ह्यात शहरी भागासाठी ३३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. भोकरदन शहरासाठी ४ कोटी, परतूरसाठी ६ कोटी, अंबडसाठी ६ कोटी तर जालना शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. संपूर्ण शाळांवर सोलार सिस्टीम बसवा. त्यासाठी ५० टक्के निधी जिल्हा विकास आराखड्यातून द्यावा, उर्वरित निधी राज्य शासन देईल. तीन हजारांपर्यंत लोकसंख्या असणाºया ग्रामपंचायतींना गावातील इलेक्ट्रिक ट्रेड उत्तीर्ण तरुणांना लाइनमन म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश त्यांनी दिले. खा. दानवे म्हणाले, विजेचा पुरेपूर वापर करण्यासाठी राज्यात पायाभूत सुविधा निर्मितीचे काम वेगात सुरू आहे. पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, जिल्ह्यातील विकासकामांसाठी १८५ कोटी निधी मंजुर केले आहेत. जिल्ह्याचा विजेचा बॅकलॉग तातडीने भरून काढावा, अशी अपेक्षा राज्यमंत्री खोतकर यांनी व्यक्त केली. आ.टोपे यांनी जिल्ह्यातील वीजपुरवठ्याच्या अडचणी सोडविण्याची मागणी केली.